सहाय्यक आयुक्त महानगरपालीका यांचे कार्यालयावर बांधकाम कामगारांचे धरणे आंदोलन #citu - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सहाय्यक आयुक्त महानगरपालीका यांचे कार्यालयावर बांधकाम कामगारांचे धरणे आंदोलन #citu

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर: 


इमारत बांधकाम कामगारांकरीता कल्याणकारी मंडळ तयार व्हावे या मागणीला घेउन सिआयटीयु चे नेतृत्वात मुंबई मंत्रालया समोर दिर्घकालीन लढा झाला. त्याचाच परीणाम महाराष्ट्र शासनाला इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी लागली. या कल्यणकारी मंडळाचे वतीने मुलांच्या शिक्षणाची कुटुंबाच्या आरोग्याची कामगारांच्या भविष्याची जबाबदारी घेण्यात आली असली तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याकारणाने कामगारात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता.

कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याकरीता चंद्रपूर जिल्हा सिआयटीयू चे वतीने सहाय्यक आयुक्त महानगर पालीका यांचे कार्यालयासमोर धरणा कार्यक्रम करण्यात आला कामगारांना न्याय मिळालाची पाहीजे, संघर्ष हमारा नारा है भावी इतिहास हमारा है, कल्याणकारी मंडळाची अंमलबजावणी झालीच पाहीजे अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या. प्रा. दहीवडे म्हणाले कल्याणकरी मंडळाची स्थापना व्हावी याकरीता कामगारांनी दिर्घकालीन लढा दिला व शासनाला बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी लागली. 

आता त्याची अंमलबजावणी करवून घेण्याकरीता देखिल कामगारांना रस्त्यावर उतरावे लागते. कामगार चळवळीचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास आहे. आज पर्यंत कामगारांना जे काही मिळाले ते संघर्षातूनच मिळाले आहे. जे काही कुणाच्या कृपादृष्टिने मिळाले नाही हे कामगारांनी लक्षात घ्यावे प्रमोद गोडघाटे, विद्या निब्रड यांचे नेतृत्वात शिष्टमंडळ सहाय्यक आयुक्त सचिन पाटील यांना भेटले व मागण्याचे निवेदन सादर केले. नाका कामगारांना ९० दिवसांचा दाखला देतेवेळी परवानाधारक ठेकेदारांच्या प्रमाणपत्राची कुठेही अट नसतांना मागणी केली जाते. तशी मागणी करण्यात येऊ नये. 

नावाच्या नोंदनीकरीता व नुतनीकरण करतेवेळी टॅक्स पावती आणण्याची सक्ती करण्यात येउâ नये. इमारत बांधकाम कामगार व्यतीरीक्त इतर बांधकाम कामगारांना देखिल नोंदनी करण्याचा अधिकार आहे. बांधकाम कामगारांच्या बाबतीत उदयोग व उर्जा व कामगार विभागाच्या वतीने जे शासन निर्णय झाले आहे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. इत्यादी मागण्यांचा समावेश होता. शासननिर्णयानुसार काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. असे आश्वासन सहाय्यक आयुक्त सचिन पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले. अशी माहिती महेंद्र बनकर यांनी दिली. धरणा कार्यक्रम यशस्वी करण्यात तपन देवांगण, बंडू गोडबोले, संदिप पाटील, वामन बुटले, माधुरी हिरवाणी, प्रमिन साहू, कवियीत्री देवांगण आदिंनी विषेश परीश्रम घेतले.