"शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा व भव्य जाहीर व्याख्यान २०२०" #chatrapatishivajimaharaj - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

"शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा व भव्य जाहीर व्याख्यान २०२०" #chatrapatishivajimaharaj

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

मराठा सेवा संघ प्रणित वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद,चंद्रपूर तर्फे शिवजयंती निमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून दि.२० फेब्रुवारी २०२० पर्यत निबंध पाठविण्याची अंतिम मुदत आहे.

निबंधासाठी विषय:-
१) बहुजनप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज
२) शिवरायांचे महिलांविषयक धोरण
३) शिवरायांचा प्रजाहितदक्ष राज्यकारभार
४) आज शिवराय घडवायचे असतील तर.

शब्दमर्यादा- १५०० ते १८०० शब्दात निबंध लेखन असावे. 

 • बक्षीसे -
 • प्रथम -२१००/- ₹  रोख, शिवचरित्र पुस्तक, प्रमाणपत्र
 • द्वितीय-११००/- ₹ रोख, शिवचरित्र पुस्तक, प्रमाणपत्र
 • तृतीय- ७००/- ₹ रोख, शिवचरित्र पुस्तक, 

स्पर्धेविषयी नियम व अटी -
१) सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र  देण्यात येईल.
२) इयत्ता ११वी पासून ते सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक व पालक इ. स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
३) परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील .
४) निबंध मराठी ,हिंदी ,इंग्रजी, भाषेतच असावा .
५)चार विषयांपैकी कोणत्याही एकाच विषयावर निबंधलेखन करावे .
६) निबंध स्वतंत्र व स्वलिखीत असावा. (परीक्षकांना अक्षरे कळणारे असेल तर) अथवा टाइप करून निबंध surajdahagavkar2030@gmail.com या ई-मेल वर पाठवावा किंवा पोस्टाने पाठवावे.
८) प्रत्येक स्पर्धकाला केवळ एक निबंध स्पर्धेसाठी पाठविता येईल.
९)परिस्थितीजन्य काही बदल झाल्यास आपणास कळविण्यात येईल.

बक्षीस वितरण समारंभ
दिनांक-२५ फेब्रुवारी २०२०
वेळ-सायंकाळी ०६:०० वाजता
स्थळ-प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह,चंद्रपूर.

------------------------------------------
निबंध पाठविण्याचा पत्ता:-
१)मराठा सेवा संघ जिल्हा कार्यालय,आक्केवार वाडी,तुकुम,चंद्रपूर.
०२)मयूर मेडिकल ,तुकुम,चंद्रपूर

अधिक माहितीसाठी संपर्क
सुरज पी.दहागावकर - 8698615848
आचल शेंडे -8600280803

टीप - सदर निबंध स्पर्धेतील उत्कृष्ट निबंध लेखनाचे पुस्तक प्रकाशित करण्यात येईल.हा मॅसेज इतरांना जास्तीत जास्त पाठवावा हि विनंती.