बाजारात जे विकते, शेतात तेच पिकवा : खासदार बाळू धानोरकर शेतकरी महोत्सव २०२० : बळीराजा विशेषांक ई-बुकचे प्रकाशन #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

बाजारात जे विकते, शेतात तेच पिकवा : खासदार बाळू धानोरकर शेतकरी महोत्सव २०२० : बळीराजा विशेषांक ई-बुकचे प्रकाशन #chandrapur

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 


बाजारात जे सहज विकल्या जाते, ज्या वस्तूची मागणी आहे, तीच वस्तू शेतात पिकवा. शेतीतून आकस्मीक होणारे नुकसान सोसण्यासाठी शेतीपुरक जोडधंदा करा. शासनाकडून मिळणाऱ्या सबसिडीचा व योजनांचा लाभ घ्या, असे प्रतिपादन शेतकरी महोत्सव २०२० ई-बूक प्रकाशन करतांना खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.

कुणबी समाज मंडळाच्या वतीने आयोजित स्थानिक चांदा क्लब ग्राउंड येथे सुरु असलेल्या शेतकरी महोत्सव २०२० च्या मुख्य सत्राचे उद्घाटन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे हस्ते शनिवारी (ता. ८) ला झाले. यावेळी बळीराजा विशेषांक ई-बुकचे प्रकाशन खासदार धानोरकर यांचे हस्ते करण्यात आले.
सावित्री-ज्योतीबा मंचावर यावेळी अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वरराव टेमुर्डे होते. तर सत्कारमूर्ती चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार होते.

प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड. वामनराव चटप, मनोहर पाऊणकर, अनिल धानोरकर, रमेश राजुरकर, दिनेश चोखारे, राजेंद्र वैद्य, बळीराज धोटे, डॉ. सुरेश महाकुलकर, सुधाकर अडबाले, तात्यासाहेब मत्ते, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, श्रीधरराव मालेकर आदी उपस्थित होते. यावेळी आमदार जोरगेवार, राजेंद्र वैद्य, अ‍ॅड. चटप यांचा सत्कार करण्यात आला.

पुढे बोलतांना खासदार धानोरकर यांनी जिल्ह्यात वन्यप्राणी-शेतकरी संघर्ष मोठा गंभीर झाला आहे. त्यासाठी नविन कायद्यांची गरज आहे, संसदेत यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही दिली.या शेतकरी मेळाव्याने समाजात एक पायंडा घातला आहे. आता दरवर्षीच हा शेतकरी मेळावा व्हावा. सामान्य नागरीकांनी शेतकऱ्यांचा माल घेतांना भावबाजी करु नये, असे अध्यक्षस्थानावरून बोलताना अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे म्हणाले.अ‍ॅड. वामनराव चटप म्हणाले, शेतकऱ्यांना मारक कायदे रद्द करण्यात यावे. शेतकऱ्यांचा माल जिवनावश्यक वस्तूंच्या कायद्यातून बाहेर काढला जावा. तरच शेतकऱ्यांच्या मालाचा भाव वाढेल.सत्कारमूर्ती आमदार जोरगेवार म्हणाले, पुढील वर्षी शासनासोबत पब्लिक पार्टनर जॉइंट व्हेंचर करून या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करू. शेतकऱ्यांसाठी जे-जे करता येईल ते करु, असे त्यांनी सांगितले.प्रास्ताविक अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते यांनी केले. संचालन प्रा. रविकांत वरारकर तर आभार विनायक धोटे यांनी केले. 
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन :
शेतकरी महोत्सवाची पहिली सायंकाळ सांस्कृतिक कार्यक्रमाने रंगली. सांस्कृतिक समारंभाचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. अध्यक्षस्थानी विजयालक्ष्मी डोहे, प्रमुख पाहुणे म्हणून सुनीता लोढीया, मीना माथनकर, अस्मिता गौरकार यांची उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार धानोरकर यांचा सत्कार करण्यात आला. संचालन तनुजा बोढाले तर आभार किरण बल्की यांनी मानले. यावेळी महिला व बालकांनी नृत्य, एकपात्री अभिनय व नाटक सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन सविता कोट्टी यांनी केले.