शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब : माजी खासदार नरेश पुगलिया : शेतकरी महोत्सवाचे थाटात उद्घाटन, कुणबी समाज मंडळाचे आयोजन, मेळाव्यात १६० स्टॉल, आरोग्य व रोगनिदान शिबिर, शेतीसारखा दुसरा व्यवसाय नाही : भालचंद्र ठाकूर #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब : माजी खासदार नरेश पुगलिया : शेतकरी महोत्सवाचे थाटात उद्घाटन, कुणबी समाज मंडळाचे आयोजन, मेळाव्यात १६० स्टॉल, आरोग्य व रोगनिदान शिबिर, शेतीसारखा दुसरा व्यवसाय नाही : भालचंद्र ठाकूर #chandrapur

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :
मागील काही दिवसांमध्ये शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांना आत्महत्येची वेळ आली आहे. ही महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी बाब आहे. आपली नाळ जमिनीशी जुळली आहे. त्यामुळे अधिकाधिक प्रयत्न करून शेती व्यवसाय समृद्ध करणे गरजेचे असल्याचे मत माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले. 

शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, ग्रामीण भागातील महिला बचतगट उत्पादनास बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशातून कुणबी समाज मंडळाच्या वतीने चांदा क्लब ग्राऊंडवर आयोजित दोनदिवसीय शेतकरी महोत्सवाला शनिवारपासून सुरवात झाली. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. 


शेतकरी महोत्सव २०२० मधील चर्चासत्र, मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, ए. हैदरभाई, अविनाश ठावरी, सुधाकर अडबाले, महादेव पिंपळकर, व्याहाड साहेब, नगरसेवक अशोक नागापूरे, तर मार्गदर्शक म्हणून अशोक अग्रवाल, भालचंद्र ठाकूर, तात्यासाहेब मत्ते, राजेश गायधनी, प्रवीण वानखेडे आदींची उपस्थिती होती.

पुगलिया पुढे म्हणाले, पूर्वी कुणबी समाज मंडळ केवळ वधू-वर परिचय मेळाव्यापूरतेच मर्यादीत होते. मात्र, नवीन कार्यकारिणी मंडळाने यामध्ये बदल करून थेट कृषी मेळाव्याचे आयोजन केले. यामुळे शेतकऱ्यांना याचा लाभ होईल. कृषी विभागानेही शेतकऱ्यांच्या बांधावर जाणे गरजेचे आहे. मात्र, काही वर्षांमध्ये अधिकारी बांधावर जाताना दिसत नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती बदलायची असेल तर सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी कर्डिले म्हणाले, शेती हा किचकट आणि जोखमीचा व्यवसाय आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी स्वत:ची फाईल तयार करून प्रत्येक गोष्टीची नोंद केली पाहिजे. यासाठी शेती विषयक पुस्तकांची जोड घेतल्यास त्याचा अधिक फायदा होईल. शेतीचा विकास विविध योजनांतून साध्य करणे शक्य नसून परिश्रम आणि नवीन जोड देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे यांनी शेतकऱ्यांचे पाठीशी असल्याचे मत व्यक्त केले. 

प्रास्ताविकात या महोत्सवाची पाश्र्वभूमी आयोजन कृति समितीचे प्रमुख श्रीधरराव मालेकर यांनी विशद केली. संचालन प्रा. अनिल डहाके तर आभार विनायक धोटे यांनी मानले. महोत्सवाला मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.  

मेळाव्यात १६० स्टॉल :

मेळाव्यात कृषीपयोगी यंत्रसामुग्री, विविध खाद्यपदार्थ, शासकीय योजनांची माहिती असे वेगवेगळे स्टॉल लावण्यात आलेले आहे. यात बचतगट व कृषी वस्तू प्रदर्शनी व विक्रीचे १२८ स्टॉल, विविध खाद्यपदार्थ २६ व विविध विषयांवर लाईव्ह प्रात्यक्षिक करून दाखविणारे ६ स्टॉल असे एकूण १६० स्टॉल महोत्सवात आहेत. खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर शेकडोंनी गर्दी केली होती. आरोग्य व रोगनिदान शिबिर : 
शेतकरी महोत्सवानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यासाठी ७० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सेवा देत आहे. शिबिरामध्ये गरजेनुसार रुग्णांना औषधीचेही वितरण करण्यात येत आहे.शेतीसारखा दुसरा व्यवसाय नाही : भालचंद्र ठाकूर

कृषी विभागात तंत्रज्ञान झपाट्याने बदलत चालले आहे. त्या बदलत्या तंत्रानुसार आपल्यालाही बदलणे गरजेचे आहे. केवळ इज्राईलची तुलना करून चालणार नाही. तर त्यांनी तंत्रज्ञानाचा अवलंब केला. तसाच अवलंब आपल्यालाही करणे गरजेचे असून नव्यानव्या तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेती करण्याचा सल्ला रुची ऑफ ग्रृप कंपनीजचे संचालक भालचंद्र ठाकूर यांनी चर्चासत्रात दिला.