चंद्रपूर मनपाद्वारे खरेदी केलेल्या आधुनिक बॅटरी ऑपरेटेड अँब्युलन्स व शववाहिकेचे लोकार्पण करून शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला सुपूर्त #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर मनपाद्वारे खरेदी केलेल्या आधुनिक बॅटरी ऑपरेटेड अँब्युलन्स व शववाहिकेचे लोकार्पण करून शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला सुपूर्त #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आधुनिक रुग्णवाहिका व शववाहिका खरेदी करण्यात आल्या असून त्या जनहितार्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला सुपूर्त करण्यात आल्या आहेत.  महापौर सौ. राखी कंचर्लावार यांच्या हस्ते सदर वाहनांचे लोकार्पण १९ फेब्रुवारी रोजी मनपा यांत्रिकी विभाग कार्यालयात करण्यात आले.

महाराष्ट्र वनविकास महामंडळाच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधी अंतर्गत सदर वाहनांची खरेदी करण्यात आली असून ही दोन्ही वाहने रुग्णांच्या सेवार्थ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कार्यरत असतील. सदर वाहने ही बॅटरी द्वारे संचालित असून प्रदूषणरहित आहेत. शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून समाजातील अत्यंत गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना योग्य उपचार देता यावे तसेच शहरातील आरोग्यव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी रुग्णवाहिकेचा माध्यमातून समाजातील अत्यंत गरीब घटकालाही उपचार मिळावेत, हा मनपाचा  प्रयत्न आहे.