जिल्हापरीषद शाळांच्या नवनिर्मित ईमारतीतुन संस्कारक्षम व गुणवत्तापुर्ण विद्यार्थी तयार व्हावेत -जि.प.सदस्य संजय गजपुरे : पारडी-मिंडाळा- बाळापुर क्षेत्रातील आकापुर येथील जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळेच्या नविन ईमारतीचे उद्घाटन #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिल्हापरीषद शाळांच्या नवनिर्मित ईमारतीतुन संस्कारक्षम व गुणवत्तापुर्ण विद्यार्थी तयार व्हावेत -जि.प.सदस्य संजय गजपुरे : पारडी-मिंडाळा- बाळापुर क्षेत्रातील आकापुर येथील जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळेच्या नविन ईमारतीचे उद्घाटन #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

            
नवनिर्मित ईमारतीतुन संस्कारक्षम व गुणवत्तापुर्ण विद्यार्थी तयार व्हावेत अशी अपेक्षा  जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी पारडी-मिंडाळा- बाळापुर क्षेत्रातील आकापुर येथील  जिल्हापरिषद उच्च प्राथमिक शाळेच्या नविन ईमारतीचे उद्घाटनप्रसंगी व्यक्त केली. तसेच जि.प.शाळांचा गुणवत्तापुर्ण दर्जा वाढविण्यासाठी शासन प्रयत्नशील असुन विविध उपक्रम यासाठी जिल्हापरिषदेच्या माध्यमातुन सुरु असल्याचे संजय गजपुरे यांनी यावेळी सांगीतले.
       
जि.प.शाळा , आकापुर च्या नविन दुमजली ईमारत उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी नागभीड पं.स.च्या सभापती सौ.प्रणयाताई गड्डमवार व  उद्घाटक म्हणुन जि.प.सदस्य संजय गजपुरे होते. प्रमुख अतिथी म्हणुन गटशिक्षणाधिकारी प्रमोद नाट , आकापुर ग्रा.पं.च्या सरपंच सौ.मंजुषाताई सोनवाणे , उपसरपंच मोरेश्वर निकुरे, माजी सरपंच श्रीमती निताताई बोरकर व विलास भाकरे, उश्राळमेंढाचे सरपंच हेमंत लांजेवार, गंगासागर हेटी चे सरपंच दिलीप गायकवाड , तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेश्वर डहारे, पोलीसपाटील सुरेश सडमाके , मोतीराम पाटील भाकरे, ग्रामसेवक डेव्हीड मेश्राम तसेच ग्रा.पं.सदस्य यांची उपस्थिती होती. 
        
डावी कडवी योजनेतुन मंजुर झालेली ही शाळा अपुऱ्या निधीमुळे अर्धवट बांधकाम झालेल्या स्थितीत अपुर्णावस्थेत होती. जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी तत्कालीन पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचेकडे पाठपुरावा करुन खनिज निधीतुन यासाठी निधी उपलब्ध करुन घेतला व या दुमजली इमारतीचे बांधकाम पुर्ण करुन घेतले. या सुंदर ईमारतीच्या उद्घाटनप्रसंगी याचा आनंद विद्यार्थ्यांसह पालकांच्या चेहऱ्यावर ओसंडुन वाहत होता. सुरुवातीला सर्व अतिथिंना  लेझिमपथकासह कार्यक्रमस्थळी आणण्यात आले.
      
या समारंभाचे प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष भाकरे यांनी केले. शाळेचे मुख्याध्यापक रणधिर मदनकर सर यांनी मनोगतातुन शाळेची वाटचाल व अडचणी विषद केल्या. संचालन सहा.शिक्षक सुधाकर मदनकर सर तर आभार सहा.शिक्षक संजय दमके सर यांनी केले. कार्यक्रमाला पालक , विद्यार्थी व गावकऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती.