भोयगाव ते गडचांदुर मार्गावर धुळीने प्रवासी हैराण : निष्कृठ दर्जाच्या मुरुमाचा वापर :पाणी मारत नसल्याने धुळीमुळे नागरिकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

भोयगाव ते गडचांदुर मार्गावर धुळीने प्रवासी हैराण : निष्कृठ दर्जाच्या मुरुमाचा वापर :पाणी मारत नसल्याने धुळीमुळे नागरिकाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना प्रतिनिधी -हबीब शेख
  
भोयगाव ते गडचांदुर व भोयगाव ते वनसडी रस्ता रुंदीकरणाचे काम कासवगतिने सुरु आहे. या रस्त्यावर रुंदीकरण कामासाठी निष्कृठ दर्जाच्या मुरमाचा भराव टाकण्यासाठी वापर होत आहे. त्यातून उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारकांना त्रास होत असून आजारांना निमंत्रण मिळत असल्याने या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. 


रस्ता रुंदीकरण कामासाठी  मातीचा भराव करण्यात आला आहे. या रस्त्यावरुन लहान वाहनांसह अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. अवजड वाहन गेल्यास मातीची धूळ मोठ्या प्रमाणात उडते. या उडणाऱ्या धुळीचा त्रास दुचाकीधारक व लहान वाहनांमधून प्रवास करणाऱ्या  प्रवाशांना होतो. प्रवाशांच्या नाका-तोंडात धूळ जात असल्याने आजारांना आमंत्रण मिळून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.  उडणाऱ्या  धुळीने अनेक जण त्रस्त झाले असून श्वसनाचे आजार, दमा, खोकला, सर्दी आदींची लागण होत आहे. या समस्येला तोंड देता देता प्रवाशांच्या नाकीनऊ आले आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला रस्त्यावर पाणी मारायला वेळ नाही. मात्र ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी कवठाळा ग्रामपंचायत चे संरपच नरेश सातपुते,ग्रामपंचायत सदस्य प्रशात बोरकुटे,तंटामुक्ती अध्यक्ष दत्तुजी बदखल,नागेश बावणे सह भोयगाव, एकोडी, कवठाळा येथील ग्रामस्थांनी केली आहे