पत्नीस जिवानिशी ठार करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा - जिल्हा सत्र न्यायाधीश केदार यांचा न्यायनिर्वाळा #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पत्नीस जिवानिशी ठार करणाऱ्या आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा - जिल्हा सत्र न्यायाधीश केदार यांचा न्यायनिर्वाळा #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


घरगुती वादावरून पत्नीला जिवानिशी ठार करणाऱ्या पतीस १८ फेब्रुवारी २०२० रोजी चंद्रपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश वि. द. केदार यांनी शिक्षा ठोठावली आहे. पोलिस स्टेशन दुर्गापूर अंतर्गत येणारे आरोपी शंकर जयराम दोडके (५०) रा. दुर्गा चैक दुर्गापूर, चंद्रपूर हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. २७ नोव्हेंबर २०१७ रोजी आरोपीने संशयावरून वाद घालून तिला मारहाण केली आणि लोखंडी राॅडने तिच्या डोक्यावर मारून जिवानिशी ठार केले. याबाबत पोलिस स्टेशन दुर्गापूर येथे अपराध क्रमांक ४६४/२०१७ च्या भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा तपासात घेतल्यानंतर तपासी अधिकारी चंद्रपूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक एच. एस. यादव यांनी आरोपी शंकर जयराम दोडके यास अटक करून आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे १७ फेब्रुवारी २०२० रोजी आरोपीस भादंवि कलम ३०२ अन्वये आजन्म कारावासाची शिक्षा व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ वर्ष कारावासाची शिक्षा चंद्रपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश वि. द. केदार यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकारतर्फे सरकारी अभियोक्ता संदीप नागपुरे आणि कोर्ट पैरवी म्हणून पोलिस हवालदार करतारसिंग मडावी यांनी काम पाहिले.