पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल : राजुरा तालुक्यातील देवाडा तलाठी दिनेश पत्तीवार यांना अटक #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल : राजुरा तालुक्यातील देवाडा तलाठी दिनेश पत्तीवार यांना अटक #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : बल्लारपूर -
बल्लारशाह येथिल विश्वकर्मा पांचाळ सहकारी पतसंस्थेत लाखोंचा घोटाळा उघडकीस आला असुन त्याअनुषंगाने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असुन आरोपींमध्ये राजुरा येथे वास्तव्यास देवाडा येथील दिनेश पत्तीवार नामक  तलाठ्याचा समावेश  असल्याची प्राथमिक माहिती हाती  आली असुन काही लोकांना अटकही करण्यात  आहे.

बल्लारशाह येथिल विश्वकर्मा पांचाळ सहकारी पतसंस्थेत 17 संचालकांचे मंडळ असुन हा घोटाळा झाला त्या काळात पदावर असलेल्या संस्थाध्यक्ष तिरपत्तिवार यांचे निधन झाले आहे. प्राप्त माहितीनुसार सदर पतसंस्थेचे सन 2018 मधे लेखापरीक्षण करण्यात आले त्यात लेखापरीक्षकांना जवळपास 19 लाख रुपयांची अफरातफर झाल्याचे निदर्शनास आल्याने लेखाधिकारी नालंदा पुणेकर ह्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

2018 मधे घडलेल्या ह्या अपहार प्रकरणात कारवाई करण्यात आतापर्यंत होत असलेली टाळाटाळ संशयाचे वातावरण निर्माण करत असतानाच 17 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी छापेमारी करून संचालकांच्या घरून महत्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले असुन बल्लारशाह शहरातील 3 प्रतिष्ठित व्यक्तीसहीत राजुरा निवासी या देवाडा येथे कार्यरत तलाठ्यााला  अटक करण्यात आली असल्याची माहिती मिळाली असुन काही संचालकांनी अग्रिम जमानत घेतली आहे.