पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू : मित्रांसोबत शेततळ्यात मासेमारी करणे बेतले जीवावर #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू : मित्रांसोबत शेततळ्यात मासेमारी करणे बेतले जीवावर #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :कोरपना- हबीब शेख


शेततळ्यातील मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या तरुण युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना एकोडी शेत शिवारात रविवारी दुपारच्या 3 वाजतच्या सुमारास घडली. दिलीप उर्फ सुभाष भोयर (26) रा. भोयगाव ता.कोरपना असे मृताचे नाव आहे. 


तो भोयगाव येथे गाडी दुरुस्ती चे काम करीत होता. दिलीप व त्याचे मित्रा सोबत  एकोडी येथील शालीकराव पोवार यांच्या  शेतालगत असलेल्या शेततळ्यातील  मच्छी पकडण्यास गेले असता  अचानक पाय घसरून खोल पाण्यात पडले मात्र दिलीप यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून आकस्मिक मृत्यू झाला.  त्यांच्या सोबत गेलेल्या मित्रानी आरडाओरड करायला सुरुवात केली.  इकडे-तिकडे बघीतले पण त्यावेळी शिवारात कुणी नसल्याने दिलीपच्या मदतीला कुणीही धावून जाऊ शकले नाही. अखेर दिलीपचा शेततळ्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

घरचा कमावता मुलगा गेल्याने आई वडिलांवर उपासमारीची पाळी आली आहे शासनाने काही तरी मदत करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. याबाबत पोलीसांना माहिती दिली घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी दिलीपचा मृतदेह पाण्याबाहेर काढून तपासणीसाठी गडचांदुर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला सदर घटनेमुळे भोयर परिवारासह गावात सर्वत्र शोककळा पसरली. या प्रकरणी गडचांदुर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास गडचांदुर पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गोपाल भारती करीत आहे.