चंद्रपूर मनपाची मालमत्ताधारकांसाठी शास्तीमाफी योजना : मालमत्ताकराच्या दंडावर सूट #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर मनपाची मालमत्ताधारकांसाठी शास्तीमाफी योजना : मालमत्ताकराच्या दंडावर सूट #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर शहर महानगरपालिकेने मालमत्ताधारकांसाठी शास्तीमाफी योजना जाहीर केली असून मालमत्ताधारकांना येत्या, २१ मार्चपर्यंत शास्तीमाफीचा लाभ घेता येणार आहे. मालमत्ता कर वसुलीचा वेग वाढविण्याच्या दृष्टीने थकबाकीदारांना थकित मालमत्ता कर वसुलीसाठी मालमत्ताकराच्या दंडावर (शास्ती) सूट देण्यात येत आहे. 

या निर्णयानुसार चालू म्हणजेच सन २०१९-२० या वर्षांची मालमत्ता कराची रक्कम ज्यांनी भरली नसेल, अशा मालमत्ताधारकांनी त्यांचा कर एकरकमी भरल्यास त्यांना शास्तीमध्ये १०० टक्के सवलत मिळणार आहे. त्यासाठी मालमत्ताधारकांना येत्या, २१ मार्चपर्यंत त्यांच्याकडील सर्व देय रक्कम भरावी लागेल. जे मालमत्ताधारक २० फेब्रुवारी ते ५ मार्च २०२० या कालावधीत थकबाकीची संपूर्ण रक्कम भरतील त्यांना शास्तीत १०० टक्के सूट मिळणार आहे. तसेच त्यानंतर म्हणजे ६ मार्च ते २१ मार्च २०२० या कालावधीत थकबाकीची संपूर्ण रक्कम अदा करणाऱ्यांना शास्तीत ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. 

२२ मार्चनंतर कर अदा करणाऱ्यांना कुठल्याही स्वरूपाची सवलत मनपातर्फे देण्यात येणार नाही. करातून येणारे उत्पन्न हे महानगरपालिकेच्या उत्पनाचे  मुख्य स्रोत असल्याने व त्यावर आर्थिक बाजू अवलंबित असल्याने कराची वसुली होणे आवश्यक असते. मनपातर्फे थकबाकीदारांना याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. सन २०१९ - २० या आर्थिक वर्षात कर वसुली करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली असून करवसुलीसाठी सर्वतोपरी प्रयत्न मनपातर्फे केले जात आहेत. नागरिकांनी शास्तीमाफी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.