घनकचर्‍याच्या फलकावरून नगर परिषदेच्या सभेत रणकंदन : ६ ट्रक प्लास्टिक गहाळ #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घनकचर्‍याच्या फलकावरून नगर परिषदेच्या सभेत रणकंदन : ६ ट्रक प्लास्टिक गहाळ #chandrapur

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : नागभीड: 


नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या सभेत 'फलका' वरून चांगलेच रणकंदन झाले. या मुद्द्यावरून मुख्याधिकारी चांगलेच अडचणीत आल्याची माहिती आहे. याप्रकरणी मुख्याधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करा अशा सुचनाही काही सदस्यांनी केल्याची माहिती आहे.

कोणाला कसलीही माहिती न देता येथील हिंदू स्मशानभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारास नगरपरिषदेकडून घनकचरा व्यवस्थापन केंद्राचे फलक लावण्यात आले होते. याची छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने नागभीड शहरात चांगलाच असंतोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर नागभीड नगर पराषदेची सर्वसाधारण सभा नगर परिषदेच्या सभागृहात झाली. या सभेत विरोधी पक्षनेते दिनेश गावंडे यांनी स्मशानभूमीचे नामकरण कोणाच्या सुचनेनुसार किंवा कोणाच्या परवानगीने करण्यात आले अशी विचारणा केली. यावर अध्यक्ष आणि नगर परिषद सभापतींनी कानावर हात ठेवले. 

यानंतर गावंडे यांनी मुख्याधिकारी यांना विचारणा केली यावर मुख्याधिकारी यांनी स्वच्छता कमेटीच्या सोयीसाठी हा फलक लावल्याची कबुली दिली.यावरून या सभेत या सभेत चांगलेच रणकंदन झाले. हा सर्व हिंदूंचा अवमान आहे. या मुद्द्यावरून मुख्याधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा सुचना काही सदस्यांनी केल्या. 

६ ट्रक प्लास्टिक गहाळ :
याच सभेत ६ ट्रक प्लास्टिक गहाळ झाल्याची माहिती समोर आली. नगर परिषद गावातील घनकचरा गोळा करीत असतांना या घनकचर्‍यासोबत प्लास्टिकही येत असते. या नगर परिषद कर्मचार्‍यांकडून ही प्लास्टिक वेगळी करण्यात येते. (या प्लास्टिकवर प्रक्रिया करण्यासाठी नगर परिषदेने ३ लाख रूपये किंमतीची एक मशीन खरेदी केली असली तरी ती अशीच धुळ खात पडून आहे.) या वेगळ्या करण्यात आलेल्या प्लास्टिकची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती याच सभेत समोर आल्याने सभेत खळबळ माजली. नगर परिषद पदाधिर्‍यांना अंधारात ठेवून मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण कामे करीत आहेत. स्मशानभूमीचे नामकरण हे त्यापैकीच आहे.