सावित्रीबाई फुले विद्यालय,जुनोना येथे 'माजी विद्यार्थी मेळावा व सत्कार समारंभ' संपन्न #chandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

सावित्रीबाई फुले विद्यालय,जुनोना येथे 'माजी विद्यार्थी मेळावा व सत्कार समारंभ' संपन्न #chandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :आज दिं. 07-02-2020 रोज शुक्रवार ला सावित्रीबाई फुले विद्यालय,जुनोना येथे 'माजी विद्यार्थी मेळावा व सत्कार समारंभ' घेण्यात आला. 

याकार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सर्वसेवा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर संस्थाध्यक्ष मा. श्रीकांतजी चहारे,उदघाटक मा. राजेंद्रजी गर्गेलवार सहसचिव सर्वसेवा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर प्रमुख पाहुणे मा. साखरकर सर, मा. शेख गफ्फार शेख रोशन आणि विशेष आदरातिथ्य माजी समस्त विद्यार्थी उपस्थित होते. शाळेतून शिक्षण घेऊन शासकीय नोकरीवर प्रथम यश मिळविणारा माजी विद्यार्थी म्हणून श्री. देवा शेंडे याचा शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले इतर समस्त माजी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ व संविधानपुस्तिका देवुन सत्कार करण्यात आला.

काही माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या, शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले, संघर्षाशिवाय यश मिळत नसते हे पुन्हा पुन्हा सांगण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. नंदेश्वर सर यांनी केले, संचालन श्री. विधाते सर यांनी केले.माजी शिक्षक श्री. गाडीवान सर,श्री.प्रितम जनबंधू, श्री. रवी देवगडे, श्री. मेघश्याम पेटकुले, श्री. किशोर पेटकुले, शफिन शेख,श्री. अनिल काळबांधे ,श्री.राऊत सर यांनी विशेष मार्गदर्शन केले.आभारप्रदर्षन श्री. केदार सर यांनी केले.