थरार ! बर्निंग कार चा ! #burningcar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

खबरकट्टा / विदर्भ : वर्धा -


जिल्ह्यातील तळेगाव (शा.पं.)येथील आष्टी कडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक कार ने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. दी बर्निंग कारचा थरार अक्षरशः लोकांना पाहायला मिळाला. अचानक लागलेल्या या आगीने काही काळातच ती जळाली.परंतू या वाहनातील प्रवाश्यांनी येणारे संकट ओढवण्याचे अगोदरच लगबगीने उतरुन आपला जीव वाचविल्याने मोठे संकट टळले.


सदर घटना ही स्थानिक इनोव्हेटिव शाळेसामोर घडली.एस यु व्ही 500 कारचा स्विच ऑन करताच स्पार्किंग होने सुरु झाले. स्पार्किंग पाहून यात प्रवास करीत असलेले सात ही युवकांनी जीवाचे आक्रांताने उडी घेत धावपळ सुरु केली.पाहता पाहताच आगीने रौद्र रुप धारण केले व मिनिटातच जळून टिनटप्पर झाली. हे युवक तूमसर येथून आष्टी कडे जाण्यास निघाले होते.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.