खबरकट्टा / चंद्रपूर :
देशात बेरोजगारीचे संकट ओढावले आहे. अशात उदयोगधंदे वाढीतून रोजगार निर्मीतीच्या दिशेने पाऊल उचलने गरजेचे होते. मात्र आजच्या अर्थसंकल्पात उदयोगवाढीसाठी कोणतीही भरीव तरतुत करण्यात आलेली नाही. त्यामूळें केंद्र सरकारच्या वतीने अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेल्या अर्थ संकल्पातून बेरोजगारांची पून्हा एकदा निराशा झाली आहे. अशी प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.
आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतक-यांसाठी ठोस अशी तरतूत करणे अपेक्षीत होते. मात्र अर्थसंकल्पात केवळ आकडयांचा खेळ मांडण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य देशात सर्वाधिक कर केंद्राला देत आहे. असे असले तरी महाराष्ट्राच्या हाती या अर्थसंकल्पात अपेक्षीत असे काहिही मिळालेले नाहि. बँकेतील ठेवीदारांना ठेवलेल्या रक्कमे पैकी एक लाख रुपयापर्यंतच सरकारी सुरक्षेची हमी होती. आता ती पाच लाख रुपयापर्यंत करण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात घेण्यात आला आहे. या निर्णयाचे स्वागतही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.