हिंगणघाट येथील प्रा. पीसुडे वरील जीवघेणा हल्ला करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षेची महिला काँग्रेसची मागणी. - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

हिंगणघाट येथील प्रा. पीसुडे वरील जीवघेणा हल्ला करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षेची महिला काँग्रेसची मागणी.

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : राजुरा :--  

हिंगणघाट येथील प्राध्यापिका कु अंकिता पीसुडे यांचे वर पेट्रोल टाकून माथेफिरू युवक विक्की उर्फ विकेश नगराळे यांने जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ राजुरा तालुक्यातील महिला काँग्रेस कमीटी व्दारे आक्रोश व्यक्त करीत प्राणघातक हल्ल्याचा निषेध नोंदवला व पाशवी कृत्य करणाऱ्या मनोविकृत अपराध्याला कठोरात-कठोर शिक्षा देण्यात यावी असी मागणी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे. 
            
या प्रसंगी कविता उपरे अध्यक्ष तालुका  महिला काँग्रेस, मेघा नलगे जि प सदस्य, मुमताज अब्दुल जावेद सभापती पं स राजुरा, निर्मलाताई कुळमेथे माजी सभापती, श्रीमती सुमित्रा कुचनकर, श्रीमती नंदा गेडाम, सौ पुण्यवर्षा जुलमे, सौ कविता उईके, तुकाराम मानुसमारे पं स राजुरा, दिलीपराव वांढरे,  रवि कुरवटकर यासह महिला काँग्रेसच्या अनेक सदस्यांनी तसेच जागृत नागरिकांनी सहभाग घेतला.