चंद्रपूर ब्रेकिंग : शासकीय महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग : मद्यधुंद आरोपीवर रामनगर ठाण्यात तक्रार दाखल #चंद्रपूर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : शासकीय महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग : मद्यधुंद आरोपीवर रामनगर ठाण्यात तक्रार दाखल #चंद्रपूर

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :थोडक्यात 
राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंगणघाट जळीतकांडानंतर तर राज्यात संतापाची लाट पसरली असून, सोमवारी पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटत असताना चंद्रपुरात एका मद्यपीने शासकीय कार्यालयातील कर्मचारी महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी उजेडात आला. सदर आरोपीवर महिलेच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३५४, ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक दुर्गे रा. रयतवारी कॉलरी असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. आरोपी हा शासकीय कामासाठी कार्यालयात गेला होता. यावेळी आरोपी आणि कर्मचारी महिलेमध्ये वाद झाला. यावेळी मद्यधुंद असलेल्या दीपकने महिलेला हात पकडून शासकीय कामात अडथळा आणला. महिलेने रामनगर पोलीस ठाणे गाठून घटनेची तक्रार दिली. तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

हेही वाचा : चंद्रपूर ब्रेकिंग : बसस्थानकावर बसखाली चिरडल्याने महिलेचा मृत्यू : चालकावर गुन्हा दाखल

क्लिक करा : खळबळजनक : आई - वडीलांची तरुण मुलासोबत विहीरीत उडी घेवून आत्महत्या ◾️ मुलीने प्रेमविवाह केल्याने बदनामीच्या भीतीपोटी उचलले टोकाचे पाऊल