चंद्रपूर ब्रेकिंग : आजोबानेच नातीवर पाशवी अत्याचार केल्याची घटना उघड : शाळेतील खिचडी शिजविणाऱ्या महिलेच्या सतर्कतेने विकृत आजोबाला अटक - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : आजोबानेच नातीवर पाशवी अत्याचार केल्याची घटना उघड : शाळेतील खिचडी शिजविणाऱ्या महिलेच्या सतर्कतेने विकृत आजोबाला अटक

Share This
खबरकट्टा / ब्रम्हपुरी (चंद्रपूर) : 


आजोबानेच आपल्या अल्पवयीन असलेल्या नातीवर अत्याचार केल्याची घटना संतापजनक घटना ब्रम्हपुरीपासून ४ किमी. अंतरावरील कहाली गावामध्ये काल 6 फेब्रुवारी ला  उघडकीस आली . पोलिसांनी आरोपी असलेल्या 67 वर्षीय आजोबाला अटक केली आहे . पहिल्या वर्गात शिकत असलेल्या नातीवर अत्याचार केल्याने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

या नराधम आजोबाला ब्रम्हपुरी पोलिसांनी काल रात्री गावातून अटक केली. आरोपी च्या मुलाची पत्नी मरण पावल्यामुळे त्यांच्या मुलाने दुसरे लग्न केले. दुसर्‍या पत्नीसोबत तो नागपूर येथे राहत होता तर मुलाची मुलगी ही आईच्या मृत्यूनंतर मामाकडे राहत होती. मात्र काही दिवसांपूर्वी या नराधम आजोबाने आपल्या गावी नातीला शिकविण्यासाठी मामाकडून सदर मुलीला कहाली येथे आणले. कहाली येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीला तीचा प्रवेश घेण्यात आला. त्यानंतर विकृत मनोवृत्तीच्या आरोपी आजोबाने नातीनशी विकृत अत्याचार केला.


दरम्यान सदर बाब शाळेत खिचडी शिजविणार्‍या बाईला कळताच तिने सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेता याबाबत शाळेतील मुख्याध्यापकांना कळविले. मुख्याध्यापकांनी सदर घटना गावातील पोलिस पाटलांना सांगीतली पोलिस पाटलाच्या तक्रारीवरून आरोपीवर ३७६ २ (एन) ३७६ अब भांदवी सहकलम ४, ६ पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक के.के. रेजीवाड करीत आहेत.