राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना राजुरा तालुक्यातील जलसिंचनाच्या विविध मागण्याचे निवेदन - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राष्ट्रवादी काँग्रेसचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना राजुरा तालुक्यातील जलसिंचनाच्या विविध मागण्याचे निवेदन

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर ::राजुरा -

राजुरा तालुक्यात बारमाही वाहणारे अनेक नाले असून या नाल्यावर बंधारे बांधून पाण्याची साठवणूक करण्यात यावी, आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनी पट्टे वाटप करावे, मामा तलावांचे खोलीकरण करून सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी राजुरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.


नुकतेच मंत्री ना. जयंत पाटील हे चंद्रपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी जि.प. सभापती अरून निमजे, रा.कॉ. तालुका अध्यक्ष संतोष देरकर, शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार यांनी ही मागणी केली.राजुरा तालुक्यात बारमाही नाले असून पाणी अडविण्यासाठी बंधारे, बॅरेजेस उपलब्ध नसल्याने हे पाणी वाहून जात आहे. हे पाणी बंधाऱ्याच्या माध्यमातून जमा राहिल्यास शेतकरी व गावकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. तसेच आदिवासी शेतकऱ्यांच्या शेत जमिनीचा प्रश्न प्रलंबीत असून त्यावर तोडगा निघाल्यास त्या शेतकऱ्यांना स्वहक्काची शेती मिळणार आहे. माजी मालगुजारी तलावाचे खोलीकरण होणे आवश्यक आहे. तसेच या तलावावर सौंदर्यीकरण केल्यास गावकऱ्यांना विरंगुळ्यासाठी सोयीचे होणार असल्याच्या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे. निवेदनाचा शासनस्तरावर सकारात्मक विचार करून बंधार बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे ना. जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.