राजुरा तहसील अंतर्गत मुर्ती जवळील संभाव्य विमानतळ भद्रावती तालुक्यात स्थानांतरास आक्षेपार्ह निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर सुपूर्द :भाजपचे माजी आमदार अँड.संजय धोटे व काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी मूर्ती गावकऱ्यांच्या वतीने जमीन हस्तांतरण झाल्यावर ऐनवेळी प्रकल्प स्थानांतरास प्रखर विरोध - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

राजुरा तहसील अंतर्गत मुर्ती जवळील संभाव्य विमानतळ भद्रावती तालुक्यात स्थानांतरास आक्षेपार्ह निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर सुपूर्द :भाजपचे माजी आमदार अँड.संजय धोटे व काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी मूर्ती गावकऱ्यांच्या वतीने जमीन हस्तांतरण झाल्यावर ऐनवेळी प्रकल्प स्थानांतरास प्रखर विरोध

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :विमान प्राधिकरणाच्या माध्यमातून मुर्ती विहिरगाव येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचे भुमिसंपादन प्रक्रिया सुरू होती, शेतकऱ्यांना जवळपास ४० कोटीहून अधिक रक्कम नुकसान भरपाई जमीनी मोबदला दिला गेला आहे. 

तरीही सदर प्रकरणी मा.खासदार धानोरकर यांनी हा विमानतळ प्रकल्प भद्रावती येथे हालविण्यात यावा, तेथील शेतकरी सुद्धा जमीन देण्यास तयार असल्याचे महाराष्ट्र शासनाला कळविले आहे.  

परंतु याप्रकरणी राजुरा तहसील मधील मूर्ती शिवार भागात जमीन उपलब्ध झालेली असुन शेतकऱ्यांनी जमीन हस्तांतरास संपूर्ण सहकार्य केले आहे.या विधानसभा क्षेत्रात असलेले तीन मोठे सिमेंट उद्योग व कोल इंडिया च्या वेकोलि अंतर्गत कोळसा खाणी आहेत. सोबतच लगतच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पेपर मिल व वेकोलि खाणी अवघ्या 20किलोमीटर च्या अंतरावर असून जिल्ह्याचे ठिकाण सुद्धा नजदिक आहे. 

शिवाय महाराष्ट्रातील राजुरा तालुका तेलंगणा सीमेवर असून, या सीमावर्ती भागात आसिफाबाद ते विजयवाडा पर्यंत अनेक उद्योग आहेत. या सर्व बाबी ध्यानात घेता दळणवळणाला चालना मिळून नवा रोजगार निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन मा.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी विशेष लक्ष देऊन या प्रकल्पाला चालना दिली. हा प्रकल्प भद्रावती येथे स्थानातरणास मूर्ती व परिसरातील स्थानिक गावकऱ्यांनी विरोध केलेला आहे.

तरी मुर्ती जवळील संभाव्य विमानतळ  भद्रावती तालुक्यात स्थानांतरास आक्षेपार्ह निवेदन भाजपचे माजी आमदार अँड.संजय धोटे व काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी मूर्ती गावकऱ्यांच्या वतीने जमीन हस्तांतरण झाल्यावर ऐनवेळी प्रकल्प स्थानांतरास प्रखर विरोध दर्शविणारे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर सुपूर्द केले आहे.