ब्रेकिंग : राजुरा तालुक्यातील मूर्ती विमानतळ भद्रावती येथे हस्तांतर करण्याच्या खासदारंच्या मागणीला माजी आमदार अँड संजय धोटे यांचा पत्रकार परिषदेत प्रखर विरोध : जुन्या कामांच्या व निधी मंजुरीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये - सुदर्शन निमकर - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : राजुरा तालुक्यातील मूर्ती विमानतळ भद्रावती येथे हस्तांतर करण्याच्या खासदारंच्या मागणीला माजी आमदार अँड संजय धोटे यांचा पत्रकार परिषदेत प्रखर विरोध : जुन्या कामांच्या व निधी मंजुरीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये - सुदर्शन निमकर

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :राजुरा -महाविकास आघाडी सरकारने नव्या धोरणानुसार भाजपा युती सरकारचेे निर्णय बदलवुन नव्या धोरणानाचा विचार करणे, काही निर्णय अतिशय घाईच्या चुकीने ठरविण्याची शक्यता आहेत या संदर्भात पत्रकार परिषद घेण्यात आली. 

          
याप्रसंगी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी  पत्रकारांना राजुरा विधानसभा क्षेत्रातील होऊ घातलेल्या मुर्ती विमानतळ विषयी माहिती दिली. या विमानतळ ला विमान प्राधिकरणाच्या माध्यमातून ४६कोटी रुपये जमीन  संपादन करिता दिले असून विद्यमान खासदारानी मुर्ती विमानतळ भद्रावती येथे हस्तांतरित करण्याची मागणी जिल्हा नियोजन समिती च्या (महाराष्ट्र शासनानाला) बैठकीत केली याला आमचा विरोध आहे.विमानतळ होण्यामागचा उदेश हाच होता कि नव्या उद्योगाना चालना तथा बेरोजगारी ला आळा घालून विकास कार्य करण्याचा आमचा हेतु आहे. 

महाराष्ट्र शासनाने चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदिची समिक्षा करून परत दारु बंदी हटवावी या गोष्टीला महिला आघाडी चा तथा गाव गावातील महिला चा विरोध आहे असेही त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना अजुनही शासनाने घोषित केलेल्या कर्जमाफी चा लाभ होत नसुन जुन्या सरकारने केलेल्या कर्ज माफी च्या दस्तऐवज आधारेच  सद्यस्थितीत त्याना लाभ मिळत आहेत.  बँकेने शेतकऱ्यांना कोणत्याही सुचना न देता कर्जाचे पुनरगठन करित आहेत नव्या सरकारने अजूनही कोणत्याही प्रकारची बैठक वा नियोजित माहिती शेतकऱ्यांना दिली नसुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्याची दिशाभूल करित आहेत. 
  

विद्यमान आमदार श्री.सुभाष धोटे यांनी अमलनाला डँम सौदरिकरणावर ०७ कोटिची तरतूद करण्याची घोषणा करणारी दिशाभूल करणारी असुन सन२०१८-१९मध्ये मध्ये च चांदा ते बांदा योजने अत्तर्गत प्रशासकीय मंजुरी व निधी वितरण आदेश दिनांक ०१/०८/१९ रोजी माजी पालकमंत्री मा.श्री.सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या द्रारा तथा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ०४ कोटी ८९लक्ष ७८हजार रुपयाची तरतूद राशी मंजूर करण्यात आली आहे,  तसेच यापूर्वी अमलनाला चे सौदरिकरण करिता वन विभागानी ७०लक्ष रुपये दिले आहे. 

वास्तविक पाहता विद्यमान आमदाराने नवा निधी विकास कामाना जरुर आणावा पण जुन्या मंजुर कामाचे श्रेय घेऊन लोकाची दिशाभूल करु नयेत . तसेच या प्रसंगी माजी आमदार सुदर्शन निमकर सा यांनी  या बाबतीत सविस्तर माहिती तथा मार्गदर्शन केले. महाविकास आघाडी सरकार हे लोकाची दिशाभूल करित असुन कोणतेही लोक हिताचे निर्णय अजूनही झाले नाहीत.

या पत्रकार परिषदेला मान्यवर माजी आमदार सुदर्शन जी निमकर, जिल्हा परिषद सभापती तथा तालुका अध्यक्ष भाजपा श्री.सुनील उरकुडे  ,राजुरा नगरपरिषद चे नगरसेवक तथा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष राधेश्याम अडानिया ,  जिल्हा महिला आघाडी च्या उपाध्यक्ष्या स्वाती देशपांडे , महिला आघाडी तालुका अध्यक्ष्या तथा पचायत समितीच्या सद्यस्या  सौ.सुनदा डोंगे,पंचायत समिती सदस्या कुमारी नेयना परचाके , तालुका महामंत्री दिलिप वांढरे , भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन शेंडे , जिल्हा किसान आघाडी चे उपाध्यक्ष भाऊराव चंदनखेडे रमेश मेश्राम ,सदिप गायकवाड ,विलास खिरटकर ,पराग दातारकर ,रविजी बुरडकर ,तथा अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.