रुग्णालयांनाच स्मारक घोषित करा आणि स्मारकांसाठी असलेला सर्व निधी तेथेच खर्च करा : शालेय विद्यार्थ्यांना महिन्यातून एकदा रुग्णालय व्हिजिट करवणार ...लवकरच निघणार अध्यादेश #bachhukadu - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रुग्णालयांनाच स्मारक घोषित करा आणि स्मारकांसाठी असलेला सर्व निधी तेथेच खर्च करा : शालेय विद्यार्थ्यांना महिन्यातून एकदा रुग्णालय व्हिजिट करवणार ...लवकरच निघणार अध्यादेश #bachhukadu

Share This
आपल्या देशात कोट्यवधी रुपये खर्च करून स्मारके बांधली गेली आहेत, अजूनही बांधली जात आहेत. पण, हा पैसा जेथे गरज आहे, तेथे खर्च झाला पाहिजे. रुग्णालयांनाच स्मारक घोषित करा आणि स्मारकांसाठी असलेला सर्व निधी तेथेच खर्च करा.


खबरकट्टा / नागपूर : 


लोकांनी मंदिर, मशिद, गुरुद्वारा, चर्च आदींमध्ये जावे. मात्र, रुग्णालयांमध्येही गेले पाहिजे. तेव्हाच कळेल की आपली खरी गरज कुठे आहे. जेथे, तुमची गरज आहे. तेथे तुम्ही पोचले पाहिजे. समाजातले दुःख वेचले पाहिजे. ही सवय विद्यार्थ्यांना लागावी म्हणून शालेय विद्यार्थ्यांनी महिन्यातून एकदा रुग्णालयात भेट देण्याचा अध्यादेश काढणार असल्याची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू आज येथील वसंतराव देशपांडे सभागृहात दिली.बच्चू कडू म्हणाले, आपल्या देशात कोट्यवधी रुपये खर्च करून स्मारके बांधली गेली आहेत, अजूनही बांधली जात आहेत. पण, हा पैसा जेथे गरज आहे, तेथे खर्च झाला पाहिजे. रुग्णालयांनाच स्मारक घोषित करा आणि स्मारकांसाठी असलेला सर्व निधी तेथेच खर्च करा, असा परखड सल्ला त्यांनी दिला. एक हृदयद्रावक घटना सांगताना ते म्हणाले, "दगड फोडणाऱ्या कुटुंबातील एका महिलेची रुग्णालयात प्रसूती झाली. नवजात बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी पाच हजार रुपयांची गरज होती. तिचा नवरा, कुटुंबातील सदस्य व नातेवाइकांनी खूप प्रयत्न केले. 


पण, पाच हजार रुपयांची व्यवस्था करू शकले नाही. परिणामी बाळ दगावले आणि तिसऱ्या दिवशी त्या महिलेने बेडच्या वर असलेल्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. पाच हजार रुपयांसाठी दोन जीव गेले. देशातील स्मारकांना नव्हे तर, रुग्णालयांना पैशांची आवश्‍यकता आहे. हे जर आपण करू शकलो, तर एक चांगला देश उभा राहू शकतो असेही ते म्हणाले.