चंद्रपूर ब्रेकिंग : जनता कॉलेज विद्यार्थिनी वर हल्ला ! हिंगणघाट घटने प्रमाणे जाळून मारून टाकण्याचीही धमकी #Attack on Janata College student! - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चंद्रपूर ब्रेकिंग : जनता कॉलेज विद्यार्थिनी वर हल्ला ! हिंगणघाट घटने प्रमाणे जाळून मारून टाकण्याचीही धमकी #Attack on Janata College student!

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

  
घटनेसंदर्भात प्राप्त महितीनुसार रामनगर पोलिस स्टेशन अंतर्गत दिनांक 22 /2/2020 सायंकाळी 7:30 वाजता स्वावलंबी नगर रोड येथे कुमारी कविता (काल्पनिक नाव )राहणार सिस्टर कॉलनी हनुमान मंदिर जवळ रामनगर  ,चंद्रपुर या जनता कॉलेज ला शिक्षण घेत असलेल्या 12 विच्या विद्यार्थिनीवर हल्ला केल्याची धकादायक घटना समोर आली आहे.या घटनेतील आरोपी कार्तिक मिश्रा व त्याचा मित्र वय अंदाजे 23 वर्ष ,राहणार जलनगर वार्ड,रामनगर चंद्रपुर यांनी विद्यार्थिनी वर आपल्या मैत्रीनिच्या घरून आपल्या घराकडे दुचाकीने  स्वावलंबी नगर रोडने येत असताना  कार्तिक मिश्रा व त्याचा एक मित्र यांनी विद्यार्थिनी समोर मोटरसाइकिल आडवी करुण फोन वर बोलत बोलत का नाही म्हणत त्याने केला विद्यार्थिनीवर  हाता बुक्यांनी वार व जातिवाचक शिविगाड करत विद्यार्थिनीला हात व बुक्कीने डोळ्या वर व नाकावर मारून जखमी केले.

त्यानंतर जर तू पोलिस स्टेशनला माझ्या व माझ्या मित्रा विरुद्ध तक्रार दिली तर तुला हिंगणघाट येथे घड़लेली घटने प्रमाणे जाळून टाकीन अशी धमकी देत घटनास्थळा वरून फरार झाले. या नंतर पीडित विद्यार्थिनी आपल्या परिवार सोबत तक्रार नोंदवायला रामनगर पोलिस स्टेशन ला गेली असता तेथे ही पोलिसांनी कार्तिक मिश्रा व त्याचे मित्रांची बाजू घेत घड़लेल्या घटनेनुसार कलम न लावता कार्तिक व त्याचे मित्राला शरण साधी तक्रार नोंदविल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या परिवाराने केला आहे. साध्य विद्यार्थिनाचे 12 वी चे पेपर सुरु असताना कार्तिक मिश्रा आणि त्याचे मित्र परीक्षा स्थळी येवून तेथे ही त्याचेवर हल्ला करतील अशी भीतिही विद्यार्थिनिच्या मानत आहे तसेच घड़लेल्या घटने  पासून विद्यार्थिनी आणि तिचा परिवार भयच्या वातावरणात जगत आहे हे विशेष.
   
कार्तिक मिश्रा व त्याचा मित्रांवर  कड़क करवाई करुण विद्यार्थिनी व त्याचा परिवाराला न्याय द्यावा अशी मागणी  विद्यार्थिनी व तिच्या परिवाराने केली आहे.