गडचांदुर येथे आशादिवस उत्साहात साजरा #ashaworker - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदुर येथे आशादिवस उत्साहात साजरा #ashaworker

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


राष्ट्रीय आरोग्य अभियाना अतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गडचांदुर येथे 'आशा' दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त सर्व 'आशा' स्वयंसेविका व गटप्रवर्तकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.अकील कुरेशी यांनी आशा स्वयंसेविकांना नवजात बालकांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल माहिती दिली. नवजात बालकांना होणारा निमोनिया, जंतुसंसर्ग, हायपोथर्मिया, संक्रमण, स्तनपान समस्या, अधिक वजनाची बालके, कमी दिवसाची बालके याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.आशा' दिवसानिमित्त रांगोळी स्पर्धा, कविता वाचन, लेखन व सामान्य ज्ञान स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या. त्यात सर्व 'आशा' स्वयंसेविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यातील विजेत्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शिवाय ज्या 'आशा' स्वयंसेविकांच्या कार्यक्षेत्रात माता व नवजात बालकांचे मृत्यु झाले नाही, अशा आशा स्वयंसेविकांनाही प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


याप्रसंगी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नळे,वैद्यकीय अधिकारी डॉ.शालीनी तरोणे मैडम, वैद्यकीय अधिकारी डॉ. सहारे मैडम ,  तालुका समुह संघटन कोरपना चे समन्वयक संदीप कांबळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला आशा गटप्रवर्तक फरजाना शेख,छाया खैरे, मनिषा बुटले,संगीता वानखेडे ,आशा मत्ते व कोरपना व जिवती च्या 'आशा' स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रेखा शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन आशाताईं मत्ते यांनी मानले.