मधधुंद रुग्णवाहिका चालकाची प्रहार सेवकांनी केली कान उघडणी. पडोली पोलीस स्टेशनला दिली तक्रार खाजगी रुग्णवाहिकेशी साटे लोटे दामदुप्पट मोजावे लागतात गरजवंतांना पैसे #ambulance108 - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

मधधुंद रुग्णवाहिका चालकाची प्रहार सेवकांनी केली कान उघडणी. पडोली पोलीस स्टेशनला दिली तक्रार खाजगी रुग्णवाहिकेशी साटे लोटे दामदुप्पट मोजावे लागतात गरजवंतांना पैसे #ambulance108

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : वरोरा -


राज्यातील आपत्कालीन सेवा म्हणून 108 क्रमांकाची रुग्णवाहिका ओळखली जाते. या रुग्णवाहिकेची भारत विकास ग्रुपवर जबाबदारी सोपवण्यात आलीये. मात्र गेल्या काही महिन्यांपासून कंपनी व व्यस्थापणाचे रुग्णवाहिकेकडे दुर्लक्ष असून रुग्णवाहिकेत डॉक्टराचे पद रिक्त असून चालक मनमानी पद्धतीने कार्य करीत आहे. 

असाच प्रकार वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयातील 108 रुग्णवाहिका रुग्ण घेऊन परत येत असताना पडोली चौकात उभी होती .रुग्णवाहिका दिसताच प्रहार जनशक्ती पक्षाचे रुग्णसेवक जीवन तोंगरे, बालाजी शिवमोरे यांनी रुग्णवाहिके जवळ जाऊन विचारणा केली असता चालक रुग्णवाहिका लावून तिथून निघून गेला होता जवळपास 45 मिनिटं वाट बघितल्या नंतर चालक मधधुंद अवस्थेत रुग्णवाहिकेजवळ पोहचला .चालक मधधुंद असल्याचे माहीत होताच प्रहार जनशक्ती पक्षाच्या रुग्णसेवकांनी चालकाची चांगलीच कानउघडणी केली व जिल्हाआरोग्य अधिकारी यांच्या कडे फोन द्वारे तक्रार केली .

एवढ्या वरच हे प्रकरण न थांबता प्रहार सेवकांनी पडोली पोलीस स्टेशन गाठून चालका विरुद्ध तक्रार ही दिली .या सर्व प्रकारा नंतर त्या चालकाला जिल्हा रुग्णालयात बोलावले गेले मात्र बातमी लिहितोत्सव पोलिसांनी चालका वीरूध्द गुन्हा दाखल केला नव्हता .चालकाचे मेडिकल करून गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती तक्रार कर्त्याला दिली .

खाजगी रुग्णवाहिकेशी साटे लोटे :
दामदुप्पट मोजावे लागतात गरजवंतांना पैसे 

108 रुग्णवाहिका ही जि पी एस ट्रक र वर ऑपरेट व नियंत्रित केल्या जात असून लोकेशन हे दुसरे दिसावे व उपजिल्हा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना न गतीला खाजगी रुग्णवाहिका करण्यास भाग पडावे .या साठी बरेच दा रुग्णवाहिका ही या प्रकारे इतर ठिकाणी उभी केल्या जाते .अशी ओरड रुग्णांचे नातेवाईक नेहमीच करत असतात . अनेकदा या विषयी उपजिल्हा रुग्णालयात वाद झाले आहेत .