स्थानिकांना कंपनीत कामावर सामावून घ्या अन्यथा तीव्र आंदोलन -अँड संजय धोटे #ambujacement - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

स्थानिकांना कंपनीत कामावर सामावून घ्या अन्यथा तीव्र आंदोलन -अँड संजय धोटे #ambujacement

Share This
अंबुजा सिमेंट (मराठा सिमेंट वर्क्स प्रा. ली.) या मेगा सिमेंट प्रकल्पात स्थानिकांना रोजगारात सामावून घेण्याकरिता माजी आमदार अँड संजय धोटे करणार कंपनी प्रशासनाविरुद्ध धरणे आंदोलन.
खबरकट्टा / चंद्रपूर :

अंबुजा सिमेंट या देशातील अग्रगण्य सिमेंट उद्योगाच्या उपरवाही स्थित मराठा सिमेंट वर्क्स प्रा. ली. या मेगा प्रकल्पात स्थानिक प्रकल्पग्रस्तांना डावलून  परप्रांतीय कामगारांना कामावर सामावून घेत असल्याने स्थानिकांवर बेरोजगारी चे संकट ओढवले आहे. कंपनी प्रसाशनाला वारंवार याबाबत सूचना-विचारणा-बैठका करूनही कंपनीतील स्थायी ते कंत्राटी कामाकरिता फक्त परप्रांतीय कामगारांना  प्राधान्य देत असल्यामुळे स्थानिकांत याबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.  

या प्रकल्पग्रस्तांनी राजुरा विधानसभेचे माजी आमदार अँड संजय धोटे यांची भेट घेऊन यावर लक्ष वेधले असता आज दिनांक 14 फेब्रुवारी 2020 ला मा. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची भेट घेऊन कंपनी प्रशासनाला 7 दिवसात समज द्यावा असे अथवा अंबुजा मुख्य प्रवेश द्वारावर धरणे आंदोलन छेडण्याचा अल्टिमेटम दिला आहे.

या प्रकरणी अनेकदा बैठका घेऊन हा प्रश्न निकाली काढण्यात आला नाही त्यामुळे हे पाऊल उचलत  स्थानिक भुमिपुत्र तथा स्थानिक कुशल ,अकुशल बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यावात म्हणून  हि भूमिका घेतली - अँड संजय धोटे

राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्वच ओद्योगिक कंपनीच्या या परप्रांतीय धोरणामुळे स्थानिक युवकांवर अन्याय सातत्याने अन्याय होत आहे.कंपनी व्यवस्थापनाद्वारा  स्थानिक  भुमिपुत्राना ,प्रकल्पग्रस्तांना  ,कुशल ,अकुशल युवकाना  सातत्याने नियमितपणे व कंत्राटी स्वरूपात घेणे बंधनकारक असताना याना वंचित ठेवण्याचे काम कंपनी व्यवस्थापनाद्वारे  होत आहे.

कोणत्याही मेगा प्रकल्पात 80 % स्थानिक पातळीवर अकुशल कामगार घेणे आवश्यक असल्याचा राज्य सरकारचा शासन निर्णय डावलून जाणीवपूर्वक कामावर घेतले जात नाही. ज्या स्थानिकांनी आपल्या जमिनी या प्रकल्पांकरिता दिल्या त्यांना सुद्धा आपल्या हक्का पासून वंचित ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे.वास्तविक पाहता राजुरा विधानसभा क्षेत्रात अंबुजा, माणिकगड, अल्ट्राटेक असे मोठे उद्योग असताना या क्षेत्रातील युवक रोजगाराच्या संधी मिळण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. या कंपनीच्या ठेकेदारांना सुद्धा स्थानिकांना रोजगार देणे आवश्यक असल्याची जाणीव आहेत पंरतु ते स्थानिक युवकांच्या हाती काम न देता परप्रांतीयांना कामावर घेण्यात आल्याचे दिसून येते.तसेच कंपनीच्या माध्यमातून होणाऱ्या स्थायी स्वरूपाच्या जागांकरिता होणाऱ्या भरती प्रक्रियेतसुद्धा स्थानिकांना डावल्याल्या जात आहे. 

याचप्रकारे मौजा उपरवाही तहसील कोरपना येथे स्थित असलेली अबुजा सिमेंट कम्पनी व्यवस्थापनाद्वारा सातत्याने कंटात्री व नियमित कामगाराची भरती केल्या जाते.अंबुजा  सिमेंट कंपनीच्या व्यवस्थापनाने प्रकल्प  सुरू होताना  स्थानिक भुमिपुत्राना कंटात्री स्वरूपात कामात नियमित रोजगार उपलब्ध करून देण्याची व प्रक्लपगस्ताना कंपनीत  कामावर सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु कंपनी व्यवस्थापन ला आश्वासन ची जाणीव नसल्याचे गेल्या अनेक वर्षात स्पष्ट दिसून आले.  

या उद्योग कंपनी  मध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना व लगतच्या युवकांना प्राधान्य देत नसल्याचे निदर्शनास आले.  या कंपनीच्या माध्यमातून स्थानिक युवकांना प्राधान्याने संधी उपलब्ध करून द्यावित. जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थानसोबत नियोजित बैठक घेऊन 7 दिवसाचे आत तोडगा काढावा अन्यथा या बाबतीत निदर्शने व काम बंद  आंदोलन करण्याचा पवित्रा अँड संजय धोटे यांनी घेतला आहे.