घुग्गुस येथे रस्त्यावरील प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त :आरोग्याच्या तक्रारी वाढल्या रस्त्याच्या डिव्हायडरवर झाडें लावण्याची व रस्त्यावर पाण्याचा वर्षाव करण्याची मागणी #air pollution - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

घुग्गुस येथे रस्त्यावरील प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त :आरोग्याच्या तक्रारी वाढल्या रस्त्याच्या डिव्हायडरवर झाडें लावण्याची व रस्त्यावर पाण्याचा वर्षाव करण्याची मागणी #air pollution

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : (सुरेश खडसे,प्रतिनिधी, घुग्गुस) 

वणी- घुग्गुस ते चंद्रपूर येथे जाणाऱ्या रस्त्यावरून वेकोलि,एसीसी कंपनी, लॉईड्स कम्पनी तसेच इतर वाहने दिवस रात्र या रस्त्यावरुन जात असल्यामुळे या वाहनाच्या चाकाला लागून आलेली माती रस्त्यावर विखुरल्या जात असल्यामुळे  रस्त्यावरील धुळीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.


कंपन्यांच्या  प्रदूषणामुळे सर्दी,दमा, खोकला,चर्मरोग अशा विविध रोगाचा नागरिकांना सामना करावा लागत आहे या तिन्ही कंपन्यांनी सकाळ, दुपार, संध्याकाळ या तीन वेळेस रस्त्यावर पाण्याचा वर्षाव करावा व रस्त्यावर होणारे प्रदूषण कमी करावे अशी मागणी होत आहे. 

तसेच आयव्हीआरसीएल कंपनीने रस्त्याच्या डिव्हायडरवर झाडें लावावी व हप्त्यातून एकदा रस्ता साफ करावा कारण या धुळी मध्ये वेकोलिचा  कोळसा, एसीसी कंपनीच्या  सिमेंटचे मिक्स कण तसेच लॉईड कंपनीचे आयर्न मिक्स असल्यामुळे अनेक रोगाच्या आजारांना बळी पडावे लागत आहे.


 या धुळीमुळे अनेक दुचाकी चालकांना व पादचाऱ्यांना  डोळ्याचा त्रास होत आहे तरी राजीव रतन चौक,पोलीस स्टेशन पासून एसीसी सिमेंट कंपनी पर्यंत व बसस्थानक चौक ते बियानी विद्या मंदिर शाळे पर्यंत  रस्त्यावर पाण्याचा वर्षाव करावा अशी मागणी होत आहे.