धक्कादायक:नागपुरात सर्वेसाठी गेलेल्या महिला डॉक्टरवर ॲसिड हल्ला #acidattack - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

धक्कादायक:नागपुरात सर्वेसाठी गेलेल्या महिला डॉक्टरवर ॲसिड हल्ला #acidattack

Share This
खबरकट्टा / नागपूर :

एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन सर्वे करण्यासाठी आलेल्या महिला डॉक्टर वर तरुणाने हा हल्ला केला....!! 

नागपूर- नुकतीच हिंगणघाट येथील जळीतकांड घटना ताजी असताना आणखी एका महिला डॉक्टर वर ऍसिड हल्ला करण्यात आला आहे. दिनांक 13 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 12 वाजता सावनेर तालुक्यातील पहलेपोर येथे घडली. आरोपी निलेश कनेरे (वय 22) रा. बाजारचौक सावनेर जिल्हा नागपूर येथील रहिवाशी असे त्याचे नाव आहे. 

या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राप्त माहितीनुसार एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन सर्वे करण्यासाठी आलेल्या महिला डॉक्टर वर तरुणाने हा हल्ला केला. दरम्यान 3 नागपूर तर 2 सावनेर डॉक्टर हे पहलेपोर या गावात सर्वे करत होते. त्याच वेळी एका तरुणाने महिला डॉक्टर वर ऍसिड फेकले त्यात तीला गंभीर जखम झाली तर इतर सोफिया सोमन, शुक्रा जोशी, सुरेखा बडे, गवळी सोनेकर व सुकन्या कांबळे असे पाच महिला डॉक्टर वर ऍसिड उडाले. 

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्या तरुणाला पकडून चांगले हाणले व पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान परिसरात वातावरण चिघडले होते. आरोपीला अटक करून तात्काळ जखमींना नागपूर मेडिकल रुग्णालयात दाखल केले. पुढील तपास पोलीस करत आहेत.