अभाविप छात्रशक्तीचे शेकडो विद्यार्थी धडकले गोंडवाना विद्यापीठावर : विद्यार्थ्यांच्या विविध १४ मागण्या मांडल्या कुलगुरूंसमोर :कुलगुरू हमको पढने दो; देश को आगे बढने दो, शिक्षण आमच्या हक्काचं, अवैध फी वाढ बंद करा' अश्या अनेक घोषणांनी दणाणला विद्यापीठ परिसर :१४ पैकी अनेक मागण्या तात्काळ मान्य -उर्वरित महिन्याभरात पूर्ण करण्याचे आश्वासन #abvp - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अभाविप छात्रशक्तीचे शेकडो विद्यार्थी धडकले गोंडवाना विद्यापीठावर : विद्यार्थ्यांच्या विविध १४ मागण्या मांडल्या कुलगुरूंसमोर :कुलगुरू हमको पढने दो; देश को आगे बढने दो, शिक्षण आमच्या हक्काचं, अवैध फी वाढ बंद करा' अश्या अनेक घोषणांनी दणाणला विद्यापीठ परिसर :१४ पैकी अनेक मागण्या तात्काळ मान्य -उर्वरित महिन्याभरात पूर्ण करण्याचे आश्वासन #abvp

Share This
खबरकट्टा / गडचिरोली -चंद्रपूर 


मागील अनेक महिन्यांपासून महाविद्यालय परिसरात व गोंडवाना विद्यापीठात उपस्थित होणाऱ्या शैक्षणिक समस्यांमुळे गोंडवाना विद्यापीठ हे समस्यांचे भांडार म्हणून प्रचलित झाले आहे. चंद्रपूर असो की गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश महाविद्यालयात उद्भवणाऱ्या अनेक समस्या ह्या गोंडवाना विद्यापीठाच्या भोंगळ कारभारांमुळे व चुकीच्या निर्णयांमुळे येत आहे. अभाविप ने अनेक वेळा निवेदन, आंदोलन करून सुध्दा गोंडवाना विद्यापीठ आपल्या हा कारभार सुरळीत सुरू ठेवण्यास असमर्थ ठरीत आहेत. मुळात स्वतःच्या अनियमित कारभारामुळे व चुकीच्या निर्णयांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहेतच तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण सुध्दा होत आहे.
शिवाय विद्यापीठाने केलेली परीक्षा शुल्क वाढ, पुरवणी परीक्षा शुल्कवाढ यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा वेगळाच. या सर्व समस्या लक्षात घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शेकडोंच्या संख्येने काल  मंगळवार, दि.१८ फेब्रुवारी रोजी गोंडवाना विद्यापीठात जाहीर आंदोलन केले. 

विविध स्थानांवरुन आलेली अभाविप छात्रशक्ती, 'कुलगुरू हमको पढने दो; देश को आगे बढने दो, शिक्षण आमच्या हक्काचं, अवैध फी वाढ बंद करा' अश्या अनेक घोषणांसह आज गोंडवाना विद्यापीठावर आपल्या हक्कासाठी जाऊन धडकली. त्यावेळी संपूर्ण विद्यापीठ परिसर अभाविप कार्यकर्त्यांच्या घोषणांनी दणाणून गेले.अभाविपने या आंदोलनातुन प्रमुख १४ मागण्या मा.कुलगुरूंसमोर मांडल्या. त्यामध्ये विशेषत: मागील परीक्षांचे निकाल लावताना अनेक विद्यार्थ्यांना काही विशिष्ट विषयात शून्य गुण मिळाले, ही चूक विद्यापीठाची असून उत्तरपत्रिका तपासण्यादरम्यान झालेल्या घोळाची असल्याने त्याचा योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा, परीक्षा शुल्कात झालेली वाढ कमी करावी, फेरपरीक्षा शुल्क हे विषयानुसार घेण्यात यावे, पुनर्मूल्यांकनाचे निकाल हे लवकरात लवकर लावण्यात यावे, विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची सत्यप्रत मिळायला हवी, विद्यापीठाचे वेब सर्वर नियमित व सुरळीत चालू राहावे, ' कमवा व शिका 'तसेच 'विद्यार्थी विमा' या योजनांची सर्व महाविद्यालयात योग्य ती अंबलबजावणी व्हावी, परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आवश्यक त्या विषयांसाठी कॅलक्युलेटर सारखी साधने वापरण्याबाबत सूचना नमूद करण्यात यावी, राज्य तथा राष्ट्रीय स्तरांवरील खेळांकरिता पात्र खेळाडूंची योग्य व्यवस्था करावी तसेच अनुभवी व्यवस्थापकांची नियुक्ती करावी आदि मागण्यांचे लेखी पत्र कुलगुरूंसमोर ठेवण्यात आले. 

सुरुवातीला विद्यापीठ प्रशासनाने अनेक उडवाउडवी चे उत्तरे दिल्याने अभाविप कार्यकर्त्यांनी त्यांना वेठीस धरले. तेव्हा मात्र कुलगुरूंनी व इतर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्यांचे समाधान करत अनेक मागण्या त्वरित मान्य केल्या. व उर्वरित मागण्यांसाठी एक महिन्याच्या कालावधी मागितला.

यावेळी अभाविपच्या विदर्भ प्रांत सहमंत्री कु. सुप्रिया सोनटक्के, चंद्रपूर जिल्हा संयोजक प्रवीण गिलबिले, गडचिरोली जिल्हा संयोजक अंकुश कुंनघाडकर, ब्रम्हपुरी जिल्हा संयोजक प्रवीण गिरडकर, चंद्रपूर जिल्हा सह संयोजक शकिल शेख, तसेच चंद्रपूर नगरमंत्री शुभम निंबाळकर, महाविद्यालय प्रमुख शैलेश डिंदेवर, चंद्रपूर विद्यार्थिनी प्रमुख कु.रोशनी नागपुरे, ब्रम्हपुरी नगरमंत्री कु.सेजल दलाल, सहमंत्री, पोम्भूर्ण नगरमंत्री कृष्णा पिपरे, बल्लारपूर नगरमंत्री आशुतोष द्विवेदी यांच्या सह चंद्रपूर, ब्रम्हपुरी, गडचिरोली आदि भागातून शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थ्यींनी कार्यकर्ते उपस्थित होते.