8 आणि 9 फेब्रुवारीला क्लब ग्राउंड चंद्रपुर येथे शेतकरी मेळावा : बचत गट व कृशी प्रदर्शनी आणि मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन : कुणबी समाज मंडळ चंद्रपूर च्या आयोजनात 127 स्टॉल सहित 50 हजार शेतकऱ्यांना महोत्सवस्थळी भेटीची सुविधा #shetkarimahotsav - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

8 आणि 9 फेब्रुवारीला क्लब ग्राउंड चंद्रपुर येथे शेतकरी मेळावा : बचत गट व कृशी प्रदर्शनी आणि मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन : कुणबी समाज मंडळ चंद्रपूर च्या आयोजनात 127 स्टॉल सहित 50 हजार शेतकऱ्यांना महोत्सवस्थळी भेटीची सुविधा #shetkarimahotsav

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :
शेतक-यांना नवीन तंत्रज्ञानावी माहीती व्हावी. ग्रामीण भागातील महालाच बचत गट उत्पादनाय बाजारपेठ उपलब्ध व्हावी, लघुउद्योजकांना बळ मिळावे, ग्रामिण व शहरी भागातील भुमिपुत्रांमध्ये समन्वय वाढण्या  हेतुने कुणबी समाज मंडळ,चंद्रपुर यांच्या  वतीने ८ आणि ९ फेब्रुवारीला क्लब ग्राउंड चंद्रपुर येथे शेतकरी मेळावा, बचत गट व कृषी  प्रदर्शनी आणि मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबीरात कपीसी यंत्रसामुग्री, विविध खाधदार्थ, शासकीय विभागाचे स्टॉल, प्रदुषण जनजागृती सह ससनमुक्ती, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक आदीचे सुमारे १२७ स्टॉल राहणार आहेत. यावेळी सुमारे ५० हजार शेतकरी बांधवांची उपस्थिती अपेक्षित असुन आयोजन समितीने जिल्हयातील शेकडो गावांना भेटी देऊन जनजागरण केले आहे.

चर्चासत्र व मोफत रोगनिदान शिबीराचे उद्घाटन शनिवार दि ८ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांचे हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेशबाबु पुगलीया राहणार आहेत. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले , अतिरीक्त पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे यांची उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख मार्गदर्षक म्हणुन वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ बाळकृष्ण जडे, गोंदीया येथील रूची गृपचे भालचंद्र ठाकुर, महाविदर्भ गटशेतीवर तात्यासाहेब मते हे मार्गदर्शन करणार आहेत.दुस-या सत्रात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत कपाशी लागवड, व्यावसायीक शेतीचे व्यवस्थापन,गटशेती यावर मार्गदर्शन होणार आहे. तिस-या सत्रात शेतकरी महोत्सव २०२० व ईबुकचे उद्घाटन व प्रकाशन समारंभ खासदार बाळुभाउ धानोरकर याचे हस्ते संपन्न होत आहे. अध्यक्षस्थानी विधानसभेचे माजी उपसभापती अँड मोरेश्वर टेमुडें राहतील. याप्रसंगी आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार राहणार आहेत.

रविवार दि. ९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता भुसंपादन व जमिनीविशयक कायदे यावर अॅडपुरुषोत्तम सातपुते, बांबु लागवड उत्पादन यावर राहुल पाटील IFS, वन्यप्राण्यांमुळे शेतीव नुकसान व शासनाकडुन भरपाई याबाबत जे. डी. गहकर, दुधाळ जनावरांचे आजार यावर डॉ अंकीता रोडे, कृषी व आत्मा यंत्रणेच्या शेतीपयोगी योजना यावर कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे, पशुसंवर्धन याबाबत डॉ. अविनाश सोमनाथे, बचत गटाचे ग्रामीण अर्थ व्यवस्थेत योगदान यावर गजानन ताजणे, ट्रॅक्टर आणि अवजारांची देखभाल यावर ज्ञानेश्वर थातेड हे मार्गदर्शन करतील.या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती देताना आयोजन समिती  अध्यक्ष पुरुषोत्तम सातपुते, श्रीधरराव मालेकर, अतुल देऊळकर, विनायक धोटे, उमाकांत धांडे, विलास माथंकर, आदीची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती.