तोतया पोलिसाने मद्यपीला धाक दाखवून वसुल केले 60हजार : पोलिसांनी केली अटक #police - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

तोतया पोलिसाने मद्यपीला धाक दाखवून वसुल केले 60हजार : पोलिसांनी केली अटक #police

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : 


पोलिस असल्याची बतावणी करीत एका इसमाने ऊर्जानगर वसाहतीतील एका मद्य प्राशन करणाऱ्याकडून ४५ हजार रुपयांच्या धनादेशासह १५ हजार रुपये नगदी घेऊन पोबारा केल्याची घटना घडली.

यातील तोतया पोलिसाला दुर्गापूर पोलिसांनी अटक केली आहे. विजय पिल्ले (रा. बेलेवाडी, तुकूम) असे आरोपीचे नाव आहे. ऊर्जानगर वसाहतीत एका दारू विक्रेत्याने आरोपीशी संगनमत करून लोकांना फसविण्याची योजना आखली.त्यानुसार दारू विकणाऱ्याने वसाहतीत जावून एका व्यक्तीला दारू दिली. 

त्याने ती गाडीच्या डिक्कीत ठेवताच बाजुलाच उभ्या असलेल्या तोतया पोलिसाने त्याला पकडले. प्रकरण मिटविण्यासाठी १५ हजार रुपये नगदी,४५ हजार रुपयांचा धनादेश घेतला आणि पळ काढला. आपल्याला  फसवीविल्या गेल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसात तक्रार दिली.