अखेर 60 वर्षांपासून प्रलंबित जेवरा पुलाच्या बांधकामाला सुरवात : 10 किमीचा फेरा वाचून शेतकऱ्यांना होणार फायदा - येथील 1 कोटी 60 लक्ष निधीचे बांधकाम सुरु #bridge - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर 60 वर्षांपासून प्रलंबित जेवरा पुलाच्या बांधकामाला सुरवात : 10 किमीचा फेरा वाचून शेतकऱ्यांना होणार फायदा - येथील 1 कोटी 60 लक्ष निधीचे बांधकाम सुरु #bridge

Share This
सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने अँड.संजय धोटे यांच्या प्रयत्नांना यश

खबरकट्टा / चंद्रपूर :

             
कोरपना तालुक्यातील जेवरा ते तुकडोजी नगर नाल्यावरील खनिज विकास निधी अंतर्गत मंजूर असलेला १ कोटी ६० लक्ष निधीच्या पुलाच्या बांधकामाला सुरवात झाली आहे.सदर पूल हा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने व  राजुरा विधानसभा क्षेत्राचे तत्कालीन आमदार  अँड.संजय धोटे यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाला आहे.याकरीता गावातील नागरिकांच्या  मागणीच्या अनुषंगाने भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी वारंवार निवेदने देऊन यासंदर्भात पाठपुरावा केला होता.


            

जेवरा येथील नाल्यावर पूल नसल्यामुळे येथील नागरिकांना व विशेष करून शेतकऱ्यांना ये-जा करताना नाहक त्रास सहन करावा लागत होता,तसेच या गावातील ७०% शेतकऱ्यांची शेती ही पुलाच्या दुसऱ्या बाजूने असल्यामुळे पावसाळ्यात नाल्याला पूर येत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात गेल्यावर तब्बल १० किमीचा फेरा होत होता,या पुलाची मागणी गेल्या ६० वर्षांपासून प्रलंबित होती, या गावातील नागरिकांनी पुलाच्या मागणीसाठी अनेकदा प्रयत्न केले होते परंतु पूल मंजुर होऊ शकला नाही.
     
त्यामुळे गावातील नागरिकांनी १० जानेवारी २०१७ रोजी भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्याकडे सदर समस्येबाबत माहिती दिली व सदर समस्येची दखल घेत भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी तत्कालीन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व तत्कालीन आमदार अँड.संजय धोटे यांच्याकडे निवेदने देऊन व वारंवार पाठपुरावा केला त्यांनी या मागणीची दखल घेत खनिज विकास निधी अंतर्गत १ कोटी ६० लक्ष रुपये निधीचा पूल मंजूर केला.सदर पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण  होऊन पुलाच्या बांधकामाला सुरवात झाली आहे,त्यामुळे पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना होणार त्रास वाचणार आहे,तसेच पावसाळ्यात सुद्धा या मार्गावरुन सुलभतेने ये-जा करता येणार आहे.तसेच १०किमीच्या फेऱ्याची बचतसुद्धा होणार आहे.
      
तसेच जेवरा ही गट ग्रामपंचायत असल्यामुळे तुळशी,तांबाडी,तुकडोजी नगर या गावातील सुद्धा नागरिकांना जेवरा येथे जाण्यासाठी या मार्गाने जवळचे अंतर होणार आहेत.
     
या पुलाचे बांधकाम सुरू झाल्यावर भाजयुमो जिल्हा सचिव आशिष ताजने यांनी गावातील नागरिकांसह पुलाच्या बांधकामाची पाहणी केली.यावेळी सत्यवान चामाटे, जेवरा ग्रामपंचायत सदस्य नैनेश आत्राम,बंडू गोंडे,उरकुडा आत्राम,मंगेश मेश्राम,दिगांबर कुमरे,सुधाकर भोयर,शेख मुबारक,भास्कर मेश्राम,निखिल गोंडे,श्रीकांत गोंडे,दिनेश कन्नाके,मनोहर पेटकर,मदन गडकर,भाऊराव गडकर,नथ्थु उपासे,गणेश गडकर, दिलीप गोहणे, महादेव भोयर,मोहम्मद शेख, रमेश कोटनाके व समस्त गावकरी यावेळी उपस्थित होते.