गडचांदूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस चे शरद जोगी 6 मतांनी विजयी : निवडणुकीत भाजपाचे दोन्ही नगरसेवक तटस्थ #gadchandur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

गडचांदूर नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस चे शरद जोगी 6 मतांनी विजयी : निवडणुकीत भाजपाचे दोन्ही नगरसेवक तटस्थ #gadchandur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -गडचांदूर 


महिन्याभरापूर्वी पार पडलेल्या गडचांदूर नगरपरिषदेच्या  सार्वत्रिक निवडणूकित काँग्रेसच्या उमेदवार सविता टेकाम नगराध्यक्षपदी विजयी झाल्या.या 9 जानेवारी 2020 ला पार पडलेल्या या निवडणुकीत काँग्रेस चे  5, शिवसेना 5, राष्ट्रवादी काँग्रेस 4,भाजप 2 व शेतकरी संघटना 1असे नगरसेवक उमेदवार विजयी झाले होते.

तदनंतर उपाध्यक्षपदासाठी आज 20 फेब्रुवारी ला निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीरीपा युतीचे उमेदवार शरद जोगी यांनी शिवसेनेचे शेख सरवर शेख शालू यांचा 10  विरुद्ध 06 मतांनी पराभव करून विजय मिळविला.तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाचे नगरसेवक तटस्थ होते.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी विशाखा शेळके यांनी काम बघितले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी शहरांमधून विजय मिरवणूक काढून मतदारांना अभिवादन केले.यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पीरिपाचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.