कस्तुरबा रोड वर 6 गाड्यांचा विचित्र घटना : सुदैवाने जीवितहानी टळली - भयंकर ट्राफिक जाम : सायंकाळी 6 ची घटना #roadaccident - Khabarkatta ✒ खबरकट्टा

                     Khabarkatta  ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

कस्तुरबा रोड वर 6 गाड्यांचा विचित्र घटना : सुदैवाने जीवितहानी टळली - भयंकर ट्राफिक जाम : सायंकाळी 6 ची घटना #roadaccident

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

चंद्रपूर शहरातील कस्तुरबा रोड वरील बाबा रेस्टोरंट जवळ विशाल ऑटोमोबाईल जवळ वर्दळीत मारुती सुझुकी इग्निस गाडी एम एच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सायंकाळी 6च्या रस्त्यावरील धावत्या व रस्त्याच्या कडेला असलेला पार्किंग गाड्यांचा विचित्र अपघात झाला असून यात प्रामुख्याने 5 चार चाकी वाहन व एका ऑटोरिक्षा चे प्रचंड नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी टळली आहे. 

वृत्त लिहेपयर्यंत दिवसभर प्रचंड वर्दळ असणाऱ्या या शहरातील मार्गावर  घटनास्थळी भयंकर ट्राफिक जाम लागले असून नागरिकांनी वाहन चालकाला ताब्यात घेऊन शहर पोलिसांना पाचारण केले आहे. 

या घटनेच्या निमित्याने शहरातील पार्किंग चा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय आहे.