पालकमंत्री आपल्या दारी या नाविन्यपूर्ण योजनेचा शुभारंभ : प्रशासन आणखी गतिमान करण्यासाठीपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची संकल्पना : अधिकाऱ्यांच्या मदतीने जवळपास 500 नागरिकांचे प्रश्न मार्गी : महसूल, भूमी अभिलेख ,कृषी,पशुसंवर्धन, कौशल्य विकास व उद्योजकता, आरोग्य विभागीय अधिकाऱ्यांची उपस्थिती व विविध योजनांवर समस्या निवारण व मार्गदर्शन #vijaywadettiwar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पालकमंत्री आपल्या दारी या नाविन्यपूर्ण योजनेचा शुभारंभ : प्रशासन आणखी गतिमान करण्यासाठीपालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची संकल्पना : अधिकाऱ्यांच्या मदतीने जवळपास 500 नागरिकांचे प्रश्न मार्गी : महसूल, भूमी अभिलेख ,कृषी,पशुसंवर्धन, कौशल्य विकास व उद्योजकता, आरोग्य विभागीय अधिकाऱ्यांची उपस्थिती व विविध योजनांवर समस्या निवारण व मार्गदर्शन #vijaywadettiwar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर  : 


पालकमंत्री आपल्या दारी या नाविन्यपूर्ण योजनेचा शुभारंभ राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिन विकास तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार  यांच्या शुभहस्ते 17 फेब्रुवारी रोजी नवरगाव येथील लोकसेवा विद्यालय येथे झाला. आज दिवसभरात तालुक्यातील जवळपास 500 लोकांच्या प्रश्नाना मार्गी लावण्यात आले.

या योजनेला नवरगाव परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी आपल्या तक्रारी, समस्या टोकण क्रमांकानुसार सादर करून पालकमंत्र्यांनी स्वतः अधिकाऱ्यांच्या मदतीने जवळपास 500 नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिकारी प्रशांत खैरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपवनसंरक्षक कुलराजसिंग, ताडोबाचे उपसंचालक गुरुप्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोंढे, अॅड.राम मेश्राम, दिनेश पाटील चिटनुरवार, सिंदेवाहीच्या नगराध्यक्ष आशा गंडाटे, नवरगावच्या सरपंच अनीता गायकवाड  उपस्थित होते.

प्रशासन आणखी गतिमान करण्यासाठी या कार्यक्रमांमध्ये प्रशासनातील 20 मार्गदर्शक व समस्या निवारण स्टॉल लागले होते. या स्टॉलच्या माध्यमातून प्रशासनातील प्रत्येक विभागाची व विभागांतर्गत येणाऱ्या योजनेविषयी  सविस्तर माहिती देण्यात आली. योजनेसंदर्भात असणाऱ्या अडचणी सोडविण्यास मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.

या स्टॉलमध्ये प्रामुख्याने शिक्षण विभागातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उपयोगी विविध वस्तु पोहोचाव्यात यासाठी वस्तूंचा परिचय व मार्गदर्शन करण्यात आले. या स्टॉलची जबाबदारी विस्तार अधिकारी सिंदेवाही डॉ.आर. एम शेंडे यांनी सांभाळली, संस्कृती महिला स्वयंसहायता समूहाच्या विविध दैनंदिन उपयोगी वस्तू याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन चंदा कांबळे यांनी केले. एकात्मिक बालविकास योजना सिंदेवाही अंतर्गत जिल्हा समन्वयक बाल आकार प्रकल्प गीता जांभुळे यांनी अंगणवाडीत विविध वस्तूंचे प्रशिक्षण याविषयी सांगितले. त्याचप्रमाणे आय.एस.ओ अंगणवाडीचे मॉडेल सादरीकरण बालविकास प्रकल्प अधिकारी एन.एम.जांभुळकर यांच्या नेतृत्वात अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका यांनी केले. 

तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही सुरेश भारती यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांविषयी उपस्थितांना माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे शास्त्रज्ञ  डॉ. विजय सिडाम यांनी कृषी विज्ञान केंद्रामध्ये असणाऱ्या विविध  संशोधनाची माहिती दिली. कृषी संशोधन केंद्र याविषयीचे मार्गदर्शन सहाय्यक प्राध्यापक वनस्पतिशास्त्र सिंदेवाही मदन वांढरे यांनी दिली तर सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेच्या कार्याविषयी व लाभाविषयी सांगितले,समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर या अंतर्गत येणारे विविध योजना विषयी माहिती  विस्तार अधिकारी अनिल शिंदे  यांनी उपस्थितांना देण्यात आली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ चंद्रपुर या विषयी माहिती जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संचालक भैय्याजी येरमे यांनी दिली. 

पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती सिंदेवाही  डॉ. व्ही.बी सुरपाम यांनी पशुसंवर्धना विषयी माहिती दिली. आदिवासी विकास विभाग चंद्रपूर या विषयीच्या योजनांची उपस्थितांना विभागाचे कर्मचारी यांनी सविस्तर माहिती सांगितली. वनविभागांतर्गत सामाजिक वनीकरण याविषयी जनजागृती व्हावी व वन्य प्राण्यांची शिकार होऊ नये व  जंगलाचे संरक्षण व्हावे याविषयीचे मार्गदर्शन प्रादेशिक वनपरिक्षेत्राचे ए.आर.गोंड यांनी उपस्थितांना दिली. 


तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजना व लाभ याविषयी यासंदर्भात लाभार्थ्यांच्या तक्रारी व समस्या तसेच संजय गांधी निराधार योजना विषयी निरीक्षण अधिकारी आशिष फुलके यांच्या नेतृत्वात उपस्थितांना माहीती  देण्यात आले. भुमि अभिलेख या विभागाची सविस्तर माहिती उपअधीक्षक भूमी अभिलेख हरिदास नारनवरे यांनी दिली. सातबारा काढण्यासाठी यासाठी मदत व या विषयीची माहिती मंडळ अधिकारी नवरगाव एस.जी कन्नाके यांनी दिली. तर आरोग्य विभागा अंतर्गत येणाऱ्या विविध रोगांविषयी जनजागृती व्हावी याविषयीचे मार्गदर्शन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.पी गहलोत यांच्या नेतृत्वात उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले.

या कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी जी.आर.वायाळ, चांदा ते बांदा योजनेचे सुनील धोंगडे, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन,जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे संचालक भैय्याजी येरमे, समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव, वरीष्ठ भूगर्भ अधिकारी विजयता सोळंकी,  उपआयुक्त समाज कल्याण प्रसाद कुलकर्णी, शिक्षणाधिकारी संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी प्राथमिक दिपेंद्र लोखंडे, अग्रणी जिल्हा प्रबंधक एस.एन.झा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सोमनाथे, कार्यकारी अभियंता सिंचन अशोक बोकाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण संजय झोल्हे, कार्यकारी अभियंता बाबुराव पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता विजय पचारे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.पी गहलोत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.