रक्तदान करून युवकांनी केली शिवजयंती साजरी : नांदाफाटा येथे रक्तदान शिबीर : 50 रक्तदातांनी केले रक्तदान #blooddonation - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

रक्तदान करून युवकांनी केली शिवजयंती साजरी : नांदाफाटा येथे रक्तदान शिबीर : 50 रक्तदातांनी केले रक्तदान #blooddonation

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -नजिकच्या नांदा फाटा येथे नुकतेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिवमहोतसव समितीच्या वतीने स्थानिक श्री शिवाजी इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित शिबिरात जवळपास 50 हुन अधिक रक्तदातांनी रक्तदान केले.

शिबिराचे उद्घाटन उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले यांच्या हस्ते करण्यात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे अतिथी म्हणून ग्राम विकास अधिकारी पंढरी गेडाम, ग्राम पंचायत सदस्य रत्नाकर चटप, अभय मुनोत, प्राचार्य अलेक्झांडर डिसूझा, प्रकाश बोरकर, रविकुमार बंड़ीवार उपस्थित होते. 


यावेळी शासकीय महाविद्यालय चंद्रपूर येथील वैद्यकीय चमूनी विशेष सहकार्य केले. डॉ. अमित प्रेमचंद, डॉ. कार्तिक, लक्ष्मीकांत गाखरे, सोमनाथ बेलखेडे, मिलिंद रामटेके, सुखदेव चांदेकर, धीरज दानव उपस्थित होते. आयोजन शिवजन्मउत्सव समितीचे प्रीतम मेश्राम, अरविंद इंगोले, अशोक पानसे, प्रफुल्ल बोडके, सोनू बेग हरी बोरकुटे सागर लड़के, प्रकाश शिवणकर, अनिल नवले, रत्नाकर मानगुडगे,  अनंता धोटे, अक्षय चुडरी, संतोष थेरे, चंदन उपाध्याय, शुभम गौऊकर, लक्ष्मीकांत, मुकेश यादव, मयूर मेश्राम, प्रदीप सिंग, मनोज झेले  गणेश टोंगे, रोशन पंडित  गोरव येरमे अदीनी परिश्रम घेतले. शिबिरात गावातील युवक व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.