पुढच्या तारखेची बिल फाडण्यामागे मनपा कर्मचाऱ्यांचे गुपित काय? 4दिवस पुढच्या पावत्या फाडून दंडाच्या रकमेचा व्यक्तीत वापर तर करीत नाही ना ? नागरिकांत चर्चा ! #mncchandrapur - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

पुढच्या तारखेची बिल फाडण्यामागे मनपा कर्मचाऱ्यांचे गुपित काय? 4दिवस पुढच्या पावत्या फाडून दंडाच्या रकमेचा व्यक्तीत वापर तर करीत नाही ना ? नागरिकांत चर्चा ! #mncchandrapur

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : 


अनेक शासकीय कार्यालयात कामे दिवसोगणिक पेंडिंग असताना आपण बघतो किंवा कोणतेही काम वेळेआधी होत नसल्याचा अनुभव बहुदा आपण सर्वांनाच आला असेल. त्यातही ठरल्या तारखेवर तर नाहीच नाही परंतु या विरुद्ध तारखे पुढे जाऊन एक शासकीय कार्यालय काम करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी घातली त्यानंतर सुद्धा ठिकठिकाणी प्लॅस्टिकचा सर्रास पणे वापर होत आहे, परंतु ही कारवाई करताना सुद्धा काही कर्मचारी आपण किती हुशार आहो याची प्रचिती नागरिकांसमोर मांडत आहे असाच प्रकार चंद्रपूर मनपा झोन क्रमांक 1 मध्ये घडला.प्लॅस्टिक पन्नीचा वापर केला म्हणून अनिल शेख नामक व्यापाऱ्यांवर पालिकेतील कर्मचाऱ्यांनी 20 फेब्रुवारी ला धाड मारली, त्यांना 5000 रुपये दंडाची सर्वसाधारण पावतीही देण्यात आली परंतु ही कारवाई पालिका कर्मचाऱ्यांनी 24 फेब्रुवारी ला म्हणजेच भविष्यातील तारखांमध्ये केली अशी नोंद त्या पावती मध्ये आहे.

दंड पावती फाडण्याची प्रत्यक्ष तारीख आहे  20 फेब्रुवारी आणि पालिकेतील कर्मचाऱ्याने पावतीवर तारीख नमूद केली 24 फेब्रुवारी.याचा अर्थ कारवाही झाली नसून येणाऱ्या 24 फेब्रुवारी ला म्हणजेच येणाऱ्या दिवसात करणार, असाही होतो. 

पुढच्या तारखेची बिल फाडण्यामागे मनपा कर्मचाऱ्यांचे गुपित काय?  4दिवस पुढच्या पावत्या फाडून दंडाच्या रकमेचा व्यक्तीगत वापर तर करीत नाही ना ?  नागरिकांत चर्चा आहे.