जिवतीत छत्रपती शिवाजी महाराजांची 390 वी जयंती सोहळा संपन्न छत्रपती शिवरायांचे अनमोल विचार आचरणात आणाल तर तुमचं जीवन नक्कीच बदलेल : - मा.डॉ.शिवानंद भानुसे #jivti - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जिवतीत छत्रपती शिवाजी महाराजांची 390 वी जयंती सोहळा संपन्न छत्रपती शिवरायांचे अनमोल विचार आचरणात आणाल तर तुमचं जीवन नक्कीच बदलेल : - मा.डॉ.शिवानंद भानुसे #jivti

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर - जिवती - संतोष इंद्राळे

जगाच्या पाठीवर समतेचे, ममतेचे व न्यायचे राज्य निर्माण करणारे,माणसातील माणूसपण जागे करणारे,मानवतेच्या अस्मितेचे जनक विश्वावंद्य,कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची 390 वी जयंती सोहळा आज जिवती येथे उत्साहात साजरी करण्यात आली.


गेल्या अनेक दिवसा पासून तालुक्यातील शिवभक्तांकडून शिवजयंतीची तयारी सुरू होती आज स.जमलेल्या सर्व शिवप्रेमी कडून व शिवाजी महाराज,व जिजाऊंची वेशभूषा धारण केलेल्या विद्यार्थ्यां सोबत गावातील शिवभक्तांकडून  मुख्यमार्गाने मिरवणूक काढण्यात आली,या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.केशव पाटील गिरमाजी,माजी प.स.जिवती,तर अध्यक्ष मा.अविनाश जाधव,माजी जि.प.सदस्य राजुरा हे होते.

या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून मा.डॉ.शिवानंद भानुसे,प्रवक्ता संभाजी बिग्रेड महाराष्ट्र राज्य, मा.डॉ.संभाजी वारकड,प्राचार्य शिवाजी महाविद्यालय राजुरा हे होते.तर प्रमुख अतिथी विश्वास पुल्लरवार, गोदरू पाटील जुमनाके, पांडुरंग जाधव,महेश देवकते, पांडुरंग वारकड, प्रा.सुग्रीव गोतावळे,डॉ.अंकुश गोतावळे, सौ.अश्विनीताई गुरमे,मेहबूब शेख,सुभाष राठोड,जमालूद्दीन शेख,अशपाक शेख,अमर राठोड,गोविंद टोकरे, इत्यादी जमलेल्या सर्व पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊंच्या प्रतिमेच पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.


यावेळी कार्यक्रमाची सुरुवात गोंडवाना महाविद्यालच्या विद्यार्थ्यांनी गायन केलेल्या जिजाऊ वंदने पासून झाली.यावेळी प्रमुख वक्ते भानुसे यांनी आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची राज्यव्यवस्था त्यांच्या राजवटीतील कायदे व्यवस्था कशी होती होती व राज्यांची कर्तव्ये व न्यायनिष्ठा या सर्व गोष्टी रुपात जमलेल्या शिवभक्तांना सांगितली तर  प्रमुख अतिथी यांनी आजही देशात शिवाजी महाराजांचे व्यवस्थापण कसे होते,स्त्री सम्मान याविषयी चे कार्य समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे उदाहरणे आपल्या भाषणातून दिली.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक जि.प.उच्च प्राथ.शाळा पुडीयाल मोहदा ची दर्शनीय कवायत होती.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पांडुरंग सावंत यांनी तर आभार प्रदर्शन बळीराम शेळके यांनी मानले.या कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ शाखा  जिवती व संभाजी बिग्रेड शाखा,मराठा सेवा संघाच्या 32 कक्षाच्या शिवप्रेमीकडून करण्यात आले होते व कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी तालुक्यातील सर्व शिवभक्तांनी मोलाचे कार्य केले.