एमवे कंपनीत मेंबरशिंप मिळवून देण्याच्या नावाखाली 35 लाखानी फसवणूक ! #amway  - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

एमवे कंपनीत मेंबरशिंप मिळवून देण्याच्या नावाखाली 35 लाखानी फसवणूक ! #amway 

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

एम वे इंफोटेक प्रायवेट लिमिटेड या डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग कंपनी मधील जीआरसी स्किममधे मेम्बरशिप मिळून देण्याच्या बहान्याने  फिर्यादी संगीता ठाकरे सह ऐकून सहा जनांची तब्बल 35 लाख रूपयानी फसवणूक झाल्याबाबतची तक्रार भद्रावती पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.


प्रियंका संजय गेडाम वय 35 राहनार मूल असे आरोपी महिलेचे नाव असून, या घटनेची फिर्याद संगीता राजेश ठाकरे वय 35, राहणार गवराळा भद्रावती  यानी 6 फेब्रुवारी ला  रात्री पोलिस स्टेशनला तक्रार दखल केली, आय एम वे इंफोटेक डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग कंपनी मधे आरोपिसह ऐकून सात व्यक्ति कार्य करीत आहेत, याच कम्पनिमधे जीआरसी स्किम मधे मेम्बरशिप बनऊन अतिरिक्त आर्थिक लाभ मिळऊन देण्याचे आमिष दाखऊन तब्बल 6 जनाकड़ूँन 35 लाख रूपयाची रक्कम त्यांच्या कडून वसूल केली.

सहा महीने लोटून देखिल मेम्बरशिपचा लाभ न मिळाल्याने अखेर 5 फेबरूवारीला आरोपिच्या बगडेवाड़ी येथील कार्यालयात गेले असता आरोपी प्रियंका गेडाम हिने त्याना रक्कम देण्यास नकार दिला, तसेच स्वतजवळ असलेल्या खेळनीतिल पिस्तुलाचा वापर करीत त्याना धमकवीण्याचा  प्रयत्न केला.

त्यानंतर स्वताच्या डोक्यावर तिने पिस्तुल तानून चालते व्हा नाहीतर मी स्वताला गोळी मारेल अशी  धमकी दिली, यातील फिर्यादिने घटनास्थळी पोलिसांना पाचारन केले व या घटनेची फिरयाद भद्रावती  पोलिस स्टेशनला दाखल केली, यावरुण आरोपीवर कलम 420, 406, 506, भारतीय दंड विधान अन्वये गुन्हा दाखल केला असून वृत लिहेपर्यंत आरोपिला अटक झाली नव्हती, पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष मस्के करीत आहेत.