थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय रद्द भावी सरपंचांच्या तयारीवर विरजण राजुरा तालुक्यातील 28ग्रामपंचायती होणार प्रभावित #sarpanch - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

थेट जनतेतून सरपंच निवडण्याचा निर्णय रद्द भावी सरपंचांच्या तयारीवर विरजण राजुरा तालुक्यातील 28ग्रामपंचायती होणार प्रभावित #sarpanch

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : राजुरा -


गाव विकासाला चालना देण्यासाठी 2016-17 मध्ये
तत्कालीन भाजप सरकारने घेतलेला थेट जनतेतून लोकनियुक सरपंच निवडीचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने रद्द केला. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक भावी सरपंचांच्या तयारीवर विरजण पडले असून, इच्छुक भावी सरपंचांना सरपंच पदासाठी पुन्हा नव्याने राजकीय रणनीतीमध्ये बदल करावा लागणार आहे.

येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यात राजुरा तालुक्यातीलरा जकीयदाष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या अनेक इतर अशा एकूण 28 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्याअनुषंगाने या 28 ग्रामपंचायती मधील बहुतांश इच्छुक सरपंचांनी गेल्या दोन-तीन वर्षापासून ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणुकीची तयारी सुरु केली होती.

त्यासाठी थेट जनतेतून सरपंच होण्यास इच्छुकउमेदवारांनी गावातील गरजूंना आर्थिक मदत करणे, गावातील कोणत्याही भागातील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणे,प्रसंगी मदतीला तात्काळ धावून जाणे, ग्रामीण भागातील जनतेची रखडलेली कामे मार्गी लावणे आणि इतर कुठल्याही कार्यक्रमाना  इच्छक सरपंच  उमेदवार आवजून हजरी  लावतान दिसत होते.

संपूर्ण गावच आपला प्रभाग असल्याच्या भावनेतून ही मंडळी जनतेशी थेट संपर्कात होती. मात्र नुकत्याच सत्ता आलेल्या महाविकास आघाडी सरकारने ग्रामपंचायत निवडणुकीच्या अगदी काही महिन्यापूर्वी थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय रद्द केल्याने इच्छक सरपंचांच्या तयारीत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

इच्छुक उमेदवारांबरोबरच ग्रामीण भागातील मतदारांची सुद्धा ऐनवेळी पंचाईत झाली आहे.यानंतर गावाचा कारभारी कोण होणार? हे जनतेच्या हाती राहिले नसल्याने या निर्णयाबाबत इच्छुक सरपंच व ग्रामीण भागातील जनतेत नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.