चिमूर तालुक्यातील नेरी परीसरातील नागरीकांना होणार 26 फेब्रुवारी ते 4 मार्च पर्यंत विमान दर्शन : जमीनीपासुन २५० फुटावरून विमान घालणार घिरट्या #AIRPLAIN - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

चिमूर तालुक्यातील नेरी परीसरातील नागरीकांना होणार 26 फेब्रुवारी ते 4 मार्च पर्यंत विमान दर्शन : जमीनीपासुन २५० फुटावरून विमान घालणार घिरट्या #AIRPLAIN

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :


दळणवळणाचे तीन मार्ग भूपृष्ठ, जल व हवाई वाहतुक ही सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर असते. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला विमानाचे आजही नवलच वाटते. मात्र एका सर्व्हेक्षणासाठी चिमुर तालुक्यातील नेरी परीसरातील खाबांडा, खुटाळा, हरणी या गावातील परीसरातुन जमीनीपासुन २५० फुटावरून विमान घिरट्या घालणार आहे.त्यामुळे नेरी परीसरातील या गावांना जवळुन विमानाचे दर्शन होणार आहे.

आय.आय.सी.टेक्नालॉजी हैद्राबाद यांच्या फँक्स संदेशान्वये चिमुर तालुक्यातील हरनी, खुटाळा, खांबाडा या परीसरातुन २६ फेब्रुवारी २०२० ते ०४ मार्च २०२० या कालावधीत विशेष विमानाच्या सहाय्याने हवाई सर्व्हे सर्व्हेदरम्यान कमी उंचीवरील हवाई उड्डाने ( जमीनीपासुन २५० फुट ) उंचीवर होणार आहे. त्याद्रुष्टीने चंद्रपुर जिल्ह्यातील चिमूर उपविभागीय पोलीस अधीकारी, पोलीस ठाणे, प्रभारी अधिकारी यांनी हवाई सर्वे कालावधीत कमी उंचीवरील हवाई उड्डाने व अन्य इतर कारणावरून आपले कार्यक्षेत्रातील नागरीकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही याबाबत दक्षता व सतर्कता बाळगण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत.

हा हवाई सर्व्हे कशासाठी आहे, हे माहीत नसले तरी चिमूर तालुक्यातील नागरीकांच्या कानात विमानाच्या आवाज एक आठवडा गुंजणार असुन २५० फुटावरून विमान बघण्याचा आनंद घेता येणार आहे. या कालावधीत हवाई सर्व्हेदरम्यान विमान गोदींया, नागपुर जिल्ह्यातील काही गावावरून व छत्तीसगड राज्यातील काही गावावरूनही विमान घिरट्या घालणार आहे.