24 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिन आयोजित #mahila lokshahi din - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

24 फेब्रुवारी रोजी महिला लोकशाही दिन आयोजित #mahila lokshahi din

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर -

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय चंद्रपूर (ग्रामीण) यांचे वतीने माहे फेब्रुवारी २०२० या महिन्याचे महिला लोकशाही दिनाचे आयोजन दिनांक २४ फेब्रुवारी २०२० ला दुपारी १२.३० वाजता तहसील कार्यालय चंद्रपूर येथे तहसीलदार चंद्रपूर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेले आहे.

या महिला लोकशाही दिनात प्रपत्र १ अ मध्ये अर्ज भरुन स्विकारण्यात येतील. या महिला लोकशाही दिनात न्याय प्रविस्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवाविषयक व आस्थापना विषयक बाबी व तक्रार आणि निवेदन वयक्तिक स्वरूपाचे नसेल तर अशा प्रकारचे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. तरी महिलांनी याबद्दलची नोंद घ्यावी असे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी चंद्रपूर (ग्रामीण) यांनी केलेले आहे.