२१, २२ व २३ फेब्रुवारीला चंद्रपूरात " राज्यस्तरीय साहित्य आणि संस्कृती महोत्सव " : डॉ. रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी, तर सुशीलकुमार शिंदे करतील उद्घाटन : 23 फेब्रुवारी ला गृहमंत्री अनिल देशमुख, चित्रपट अभिनेता सचिन खेडेकर आणि पालकमंत्री ना. विजय वडेटटीवार यांची विशेष उपस्थिती ! #anildeshmukh #vijaywadettiwar #sachinkhedekar - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

२१, २२ व २३ फेब्रुवारीला चंद्रपूरात " राज्यस्तरीय साहित्य आणि संस्कृती महोत्सव " : डॉ. रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी, तर सुशीलकुमार शिंदे करतील उद्घाटन : 23 फेब्रुवारी ला गृहमंत्री अनिल देशमुख, चित्रपट अभिनेता सचिन खेडेकर आणि पालकमंत्री ना. विजय वडेटटीवार यांची विशेष उपस्थिती ! #anildeshmukh #vijaywadettiwar #sachinkhedekar

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर- चांदा क्लब चंद्रपूर तर्फे विदर्भ साहित्य संघ नागपूरच्या सहयोगाने चंद्रपूरभूषण शांताराम पोटदुखे स्मृती समर्पित तीनदिवसीय राज्यस्तरीय साहित्य व संस्कृती महोत्सव दि. २१, २२ व २३ फेब्रुवारी २०२० ला चादा क्लब ग्राऊंडवर आयोजीत करण्यात आले आहे.

देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे या महोत्सवाचे उद्घाटन करणार असून सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सचिन खेडेकर आणि चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री श्री विजय वडेटटीवार विशेषत्वाने उपस्थित राहतील. माजी कंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,आमदार सुभाष धोटे, माजी खासदार नरेश पुगलिया, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नामदेवराव कल्याणकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर, महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार आणि महोत्सवाचे संरक्षक चंद्रपूरचे जिल्हाधिकारी तथा चादा क्लबचे अध्यक्ष डॉ. कुणाल खेमणार उद्घाटन सत्राला प्रामुख्याने उपस्थित राहतील, तीनही दिवसाच्या या महोत्सवाचे अध्यक्ष प्रख्यात कादंबरीकार आणि साहित्यिक डॉ. रविंद्र शोभणे असतील.

२१ फेब्रुवारीला सकाळी १०.०० वा. आझाद बगीचा येथून ग्रंथदिंडी आणि पर्यावरण दिडीने या महोत्सवाची सुरूवात होईल. ग्रंथदिंडीमध्ये विविध महाविद्यालये, शाळा, सामाजिक,साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच ज्येष्ठ नागरीक सहभागी होतील. त्यानंतर दुपारी ३.०० वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. उद्घाटन सत्रानंतर संध्याकाळी ७.०० वा.निमंत्रितांचे कविसंमेलन जेष्ठ कवी केशव सखाराम देशमुख यांचे अध्यक्षतेखाली होणार असून यात महाराष्ट्रातील मान्यवर कवी सहभागी होतील. कविसमेलनाचे संचालन कवी इरफान शेख करतील.

दिनांक २२ फेब्रुवारीला सकाळी ९ ३० वा. निर्भया ते निर्भया एक मुक्त चिंतन या विषयावर परिसंवाद होणार असून ज्येष्ठ पत्रकार प्रतिण ब्दापुरकर या परिसंवादाचे अध्यक्षस्थानी असतील. माजी मंत्री शोभाताई फडणवीस, डॉ. पद्मरेखा धनकर, अॅड. वर्षा जामदार आणि शर्मिष्ठा भोसले आपले विचार माडतील. दुपारी १२.३० वा वर्तमान, सामाजिक आणि राजकिय वास्तवाला मराठी लेखक भिडतो का? या विषयावर साहित्य अकादमी विजेते लेखक आसाराम लोमटे याच्या अध्यक्षतेत परिसंवाद होणार असून डॉ. पी विठठल नितीन भरत वाघ, बालाजी सुतार आणि पनश्याम पाटील सहभागी होतील.


दुपारी २.३० वा अनुभव कथन होणार असून
नागपूर पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्याय, मेटी रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत तसेन दता मेपे आयुर्विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा आपले अनुभव कथन करतील. दुपारी ४.३० ते ६.३० वा समाज माध्यमे विद्वेष एकारलेपण की सूजनाचे नवे दालन या विषयावर जेष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद होणार असून देवेंद्र गावडे, श्रीपाद अपराजीत, जेष्ठ पत्रकार सुनिल कहिकर, व ओंकार दाभाडकर आपले विचार माडतील.

त्यानंतर निमंत्रीताचे कवि समलन डॉ. राजन जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली होईल व कवी अविनाश पोईनकर संचालन करतील.

२३ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वा. कथाकथन होणार असून डॉ. दिलीप अलोणे, यांच्या अध्यक्षतेत सुनिल देशपांडे, अ भा ठाकर, आणि श्रीकांत गोडबोले कथा सादर करतील. सकाळी ११.०० वा. वाढते औद्योगीकरण, पर्यावरण असंतुलन आणि असंवेदनशील सरकारे या विषया वरकिशोर रिठे यांच्या अध्यक्षतेत परिसंवाद होणार असून बंडू धोत्रे, डॉ. योगेश्वर दुधपचारे, स्वानंद सोनी आणि गजेंद्र नरवणे आपले विचार मांडतील.


दु. १.०० वा. हिंदी उर्दू कविंचा मुशायरा होणार असून नामवंत हिंदी आणि उर्दू कवी यात सहभागी होतील. द. ३.०० वा. चित्रपट निर्माता प्रख्यात कवी, वात्रटिकाकार रामदास फटाणे आणि जेष्ठ हास्यकवी अशोक नायगावकर यांचा हास्यधारा हा विनोदी कवितांचा कार्यक्रम होणार असून संध्याकाळी ५.०० वा. समारोप होईल. 

यावेळी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख, खासदार सुरेश धानोरकर, आमदार बंटी भांगडीया, आमदार सौ. प्रतिभा धानोरकर, माजी मंत्री संजय देवतळे, संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे आणि स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार उपस्थित राहतील,तीनही दिवस चालणाऱ्या या महोत्सवात नामवंत प्रकाशकांचे पुस्तक प्रदर्शन आणि विक्री,चंद्रपूर जिल्हयातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्री, फुड कोट आणि शिक्षण मेळावा महोत्सव परिसरात राहणार आहे. 

त्याचबरोबर जिल्हयातील कविंसाठी दिनांक २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी दु. १.०० ते ४.०० या दरम्यान कविकट्टा राहील. तीनही दिवस संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम राहतील. तरी जास्तीत जास्त रसिकांनी, साहित्यिकांनी आणि चंद्रपूरकरांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सवाचे कार्याध्यक्ष डॉ. कीर्ती वर्धन दिक्षित,कार्यवाह सुनील देशपांडे, डॉ. राजीव द्वारा, प्रशांत आर्वे, इरफान शेख, मधुसुदन रुंगठा,विनोद सिंह ठाकुर, अशोक संघवी, श्याम हेडाऊ याचे सह आयोजकांनी केले आहे.