जाहीर सूचना : कोरपना तालुक्यातील भोयेगाव मार्ग 23 फेब्रुवारी पासून 30 दिवस बंद :गडचांदूर ते वणी- गडचांदूर वनसडी- कोरपणा- करई- आबई फाटा- चारगांव चौकी ते वणी. २. गडचांदूर ते घुग्घूस- गडचांदूर- सांगोडा फाटा- गाडेगांव-विरुर-मुंगोली- नकोडा ते घुग्घूस. ३. गडचांदूर-चंद्रपूर- अ) गडचांदूर-खामोना-गौरी- पवनी-कडोली- हडस्ती- आरवट- दाताळा ते चंद्रपूर (हलकी वाहने). ब) गडचांदूर- राजुरा- बल्लारशा- चंद्रपूर (सर्व वाहनांकरीता) #korpana road closed - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

जाहीर सूचना : कोरपना तालुक्यातील भोयेगाव मार्ग 23 फेब्रुवारी पासून 30 दिवस बंद :गडचांदूर ते वणी- गडचांदूर वनसडी- कोरपणा- करई- आबई फाटा- चारगांव चौकी ते वणी. २. गडचांदूर ते घुग्घूस- गडचांदूर- सांगोडा फाटा- गाडेगांव-विरुर-मुंगोली- नकोडा ते घुग्घूस. ३. गडचांदूर-चंद्रपूर- अ) गडचांदूर-खामोना-गौरी- पवनी-कडोली- हडस्ती- आरवट- दाताळा ते चंद्रपूर (हलकी वाहने). ब) गडचांदूर- राजुरा- बल्लारशा- चंद्रपूर (सर्व वाहनांकरीता) #korpana road closed

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर : कोरपना - जाहीर सूचना : 


चंद्रपूर ते गडचांदूर भोयेगांव मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील वर्धा नदिच्या पुलाचे काम करणे असल्याने व सदरचे काम संपूर्ण वाहतुक बंद केल्याखेरीज करणे शक्य नसल्याने कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग–१, चंद्रपूर यांनी सदर रस्त्याची वाहतुक बंद करुन पर्यायी रस्त्याने वळविण्याबाबत विनंती केली असन जिल्हाधिकारी, चंद्रपर यांनी वाहतुक वळती करण्याबाबत परवानगी दिली आहे. 

जनतेला त्रास व असुविधा होवु नये तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता धानोरा- भोयेगांव मार्गे गडचांदूर रस्ता बंद करुन पर्यायी मार्ग निश्चित करणे आवश्यक आहे.
प्रभारी पोलीस अधीक्षक तथा अपर पोलीस अधीक्षक चंद्रपुर महाराष्ट्र पोलीस अधिनियम-१९५१ च्या कलम-३३(१) (ब) अन्वये जनतेला धोका, अडथळा किंवा गैरसोय होवु नये तसेच कोणत्याही प्रकारचा अपघात होवु नये व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरीता राज्य मार्ग क्रमांक ३७३ चंद्रपूर ते गडचांदूर भोयेगांव मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील वर्धा नदिच्या पुलाचे काम करणे असल्याने व जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी परवानगी दिली असल्याने सदरचा रस्ता दि. २३/०२/२०२० पासुन ३० दिवसांकरीता सर्व प्रकारच्या वाहनांना रहदारीस बंद करण्यात येत असुन वाहतुक दारांनी खालील पर्यायी मार्गाचा वापर करावा असे जनतेला निर्देश देत आहे.

१. गडचांदूर ते वणी- गडचांदूर वनसडी- कोरपणा- करई- आबई फाटा- चारगांव चौकी ते वणी.
२. गडचांदूर ते घुग्घूस- गडचांदूर- सांगोडा फाटा- गाडेगांव-विरुर-मुंगोली- नकोडा ते घुग्घूस.
३. गडचांदूर-चंद्रपूर- अ) गडचांदूर-खामोना-गौरी- पवनी-कडोली- हडस्ती- आरवट- दाताळा ते चंद्रपूर (हलकी वाहने). ब) गडचांदूर- राजुरा- बल्लारशा- चंद्रपूर (सर्व वाहनांकरीता).

सदर अधिसूचना दि. २३/०२/२०२० पासुन ३० दिवसांपर्यंत अंमलात राहील. वरिल निर्देशांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.