" पद्मसमाज भूषण पुरस्कार-2020 " जाहीर : पत्रकार कोंडबत्तूनवार,डॉक्टर वासलवार,कर्नल बल्लेवार,प्रा. यंगलवार, इंजिनियर दुम्पेटीवार यांना यंदाचा पुरस्कार घोषित : 1 मार्च ला मूल येथे पुरस्कार सोहळा चे पद्मशाली फॉउन्डेशन तर्फे आयोजन #mul - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

" पद्मसमाज भूषण पुरस्कार-2020 " जाहीर : पत्रकार कोंडबत्तूनवार,डॉक्टर वासलवार,कर्नल बल्लेवार,प्रा. यंगलवार, इंजिनियर दुम्पेटीवार यांना यंदाचा पुरस्कार घोषित : 1 मार्च ला मूल येथे पुरस्कार सोहळा चे पद्मशाली फॉउन्डेशन तर्फे आयोजन #mul

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर :

पद्मशाली फॉउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे पद्मशाली समाजातील सामाजिक कार्यात योगदान देवुन तसेच इत्तर क्षेत्रात त्यांचा कार्याने समाजाची मान उंचवनारे समाज बांधवासाठी  दरवर्षी 5 जणांना 'पद्मसमाज भूषण पुरस्कार' हे देण्याचे या वर्षी पासून  ठरविन्यात आले आहे.   

पद्मसमाज भूषण पुरस्कार 2020' साठी नागपुर येथील जेष्ठ पत्रकार तथा दैनिक देशोन्नती चे सल्लागार संपादक श्री.प्रभाकरजी कोंडबत्तूनवार, चंद्रपुर येथील सुप्रसिद्व ह्रदयरोग तज्ञ तथा संकल्प संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव वासलवार, सिंदेवाही येथील भारतीय सैन्य  दलात कर्नल पदावर काम करुण सेवानिवृत्त अधिकारी  कर्नल वसंतराव बल्लेवार, नागपुर येथील  साहित्यिक तसेच लेखक व सामाजिक क्षेत्रात काम करणारे सेवानिवृत्त प्रा. विजयराव यंगलवार ,गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागात आपली उत्कृष्ठ सेवा करणारे तसेच सामाजिक कार्यात हिरहिरिने सहभागी असणारे  इंजीनियर साईनाथजी दुम्पेटीवार यांची निवड करण्यात आली आहे.


या पुरस्कार निवडी साठी 10 जणांची निवडसमिती गठित करण्यात आलेली होती. कर्मवीर मा.सा. कन्नमवार सांस्कृतिक सभागृह मूल जिल्हा चंद्रपुर येथे दिनांक 1 मार्च ला पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. 

तसेच विदर्भ स्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेतिल विजेत्यानां बक्षीस वितरण व पद्मशाली  समाजातील नवोदय,10 वी,12 वी तसेच पदवी, इंजीनियर,डॉक्टर व एमपीएससी उतीर्ण गुणवंतांचा ही सत्कार होणार आहे. 

कार्यक्रमाच्या पुढच्या भागात प्रा. संजय नाथे नागपुर यांचे युवकांना मार्गदर्शन यावेळी पार पडणार आहे अशी माहिती पद्मशाली फॉउन्डेशन चे अध्यक्ष सूरज बोम्मावार,उपाध्यक्ष लोकेश परसावार,सचिव किशोर आनंदवार,कोषाध्यक्ष संतोष गोटमुकुलवार, संचालक तुलसीदास तुम्मे,अनूप श्रीरामवार, प्रफुल तुम्मेवार, राहुल मेरुगवार,मूल येथील संचालक संदीप भोगावार, महेंद्र दुस्सावार,विनीत कोकुलवार राकेश आनंदपवार, सुहास आकनुरवार, संदीप आनंदपवार यांनी दिली.