ब्रेकिंग : 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार? चर्चांना उधाण ! #notebandi - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

ब्रेकिंग : 2000 रुपयांच्या नोटा बंद होणार? चर्चांना उधाण ! #notebandi

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : थोडक्यात -सध्या 2000च्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. बँका एटीएममध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलून त्यांच्या जागी 500 रुपयांच्या नोटा टाकत असल्याची माहिती समोर आली. 

तसेच प्रत्यक्ष एटीएममधूनही पैसे काढल्यानंतर हेच जाणवत असल्याने या नोटा बंद होण्याच्या चर्चा सुरु आहे. 500 रुपयांच्या नोटा वाढवत हळूहळू 2000च्या नोटा चलनातून हद्दपार करण्याच्या विचारात सरकार असल्याची चर्चा आहे.

तीन वर्षापूर्वी नोटबंदी होऊन 500 आणि एक हजारच्या नोटा केंद्र सरकारने रद्दबातल केल्या होत्या. त्यानंतर सरकारने पाचशेची आणि दोन हजारची नवी नोट आणली होती. गेल्या काही दिवसांत दोन हजारची नोट चलनातून गायब होताना दिसत आहे. त्यामुळे आता पुन्हा नोटबंदी होऊन दोन हजारांची नोट बंद होणार असा लोकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे सरकार आता दोन हजारांची नोट बंद करणार आहे का? असा संभ्रम आहे. 

रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालानुसार एकूण चलनात दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण हे 31.18 टक्के इतके आहे. तर त्यांची किंमत ही 6 हजार 582 अब्ज इतकी आहे.