दोन बिबट व दोन अस्वस्ल शिकार प्रकरणातील संशयित आरोपीला नातेवाईकांनी वनविभागाच्या ताब्यातून पळविले : सुमारे 20 नातेवाईकांनी धक्काबुक्की करून महिला वनपरिक्षेत्राधिकाऱ्यालाही केले गंभीर जखमी #tigerhunting - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

दोन बिबट व दोन अस्वस्ल शिकार प्रकरणातील संशयित आरोपीला नातेवाईकांनी वनविभागाच्या ताब्यातून पळविले : सुमारे 20 नातेवाईकांनी धक्काबुक्की करून महिला वनपरिक्षेत्राधिकाऱ्यालाही केले गंभीर जखमी #tigerhunting

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : भद्रावती -

आयुध निर्माण कामगार वसाहत परिसरातील दोन बिबट आणि दोन अस्वल शिकार प्रकरणात तपास प्रक्रियासुरू असतांना पिंपरबोडी येथीलएका संशयित आरोपीला शनिवारी 8 फेब्रुवारी ला तपासासाठी वनविभागाने ताब्यात घेऊन कार्यालयात आणले. 


त्याच्या मागोमाग आरोपीच्या सुमारे विस नातेवाईकांनी वनपरिक्षेत्र कार्यालयात येऊन महिला वनपरिक्षेत्राधिकारी यांच्यासह त्यांच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून आरोपीला पळवून घेऊन गेले.

हा प्रकार 8 फेब्रुवारी ला शनिवारी सायंकाळी घडला. यातील सहा आरोपीवर पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला असल्याचे समजते.अलीकडेच घडलेल्या दोन बिबट आणि दोन अस्वलांच्या शिकार प्रकरणातील संशयित आरोपी विनोद सरवन चेट्टी रा.पिपरबोडी हा शनिवारी सायंकाळी पिपरबोडी परिसरात आढळला. त्याला चौकशीसाठी कार्यालयात आणले. त्यानंतर त्याचा भाऊ हरीश शेट्टी हा चारचाकी वाहनांमध्ये तब्बल वीस महिलाव पुरुष यांना घेऊन कार्यालयात आला. 

वनपरिक्षेत्राधिकारी स्वाती महेशकर यांना धक्काबुक्की करून त्यांचा हात मुरगळला व आरोपीला सोडवून पळवून नेले.या घटनेत वनपरिक्षेत्राधिकारी स्वाती महेशकर यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.या घटनेची तक्रार भद्रावती पोलिसात केली असून आरोपीचा शोध सुरु आहे.