खबरकट्टा च्या वृत्तामुळे काही मिनिटातच पटली अनओळखी मृतदेहाची ओळख : मृतक : संतोष रामचंद्र वाटेकर : मृतक निघाला वणीतील एटीएम रोख चोरीतील आरोपी :20 फेब्रुवारी पासून 28 लाखाच्या रोख सहित होता फरार ! #ATM CASH - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

खबरकट्टा च्या वृत्तामुळे काही मिनिटातच पटली अनओळखी मृतदेहाची ओळख : मृतक : संतोष रामचंद्र वाटेकर : मृतक निघाला वणीतील एटीएम रोख चोरीतील आरोपी :20 फेब्रुवारी पासून 28 लाखाच्या रोख सहित होता फरार ! #ATM CASH

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना प्रतिनिधी - हबीब शेख 


कोरपना तालुक्यातील खैरगाव येथे अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असून मृतकाची ओळख पटली नसल्याचे वृत्त काल 28 फेब्रुवारी ला रात्री 12 वाजता प्रसारित करण्यात आले होते.
हे वृत्त खबरकट्टा वर  वायरल होताच एका सतर्क वाचकाने 15 मिनिटाच्या आत वृत्त वर्णनावरून  अनोळखी मृतक व्यक्ती वणीतील इसम असण्याची शक्यता पुराव्यानिशी माहिती देऊन व्यक्त केली. त्यानंतर टीम खबरकट्टा ने तात्काळ गडचांदुर पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री गोपाल भारती यांना सर्व पुरावे माहिती देताच  त्यांनी वणी येथील पोलीस स्टेशन ला संपर्क साधल्यावर सदर मृतक वणी येथील  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये कॅश  टाकताना एका प्रायव्हेट कंपनीचा संतोष नामक कर्मचारी रोख रकमेसहित 20 फेब्रुवारी च्या सायंकाळ पासून गायब असल्याची माहिती देताच त्याच्या शरीरयष्टीवरून ओळख पटली. सविस्तर वृत्त असे की 20 फेब्रुवारी रोजी बँकेतून एटीएम मध्ये टाकण्यासाठी 28 लाख रुपये घेऊन पसार झालेला आरोपी संतोष वाटेकर याचे शव कोरपना तालुक्यातील खैरगाव ते गाडेगाव  येथील रोडलगत असलेल्या नाल्यात मिळून आले. तब्बल 8 दिवसानंतर संतोषाचा मृतदेह मिळून आल्याने वणीकरांत अनेक चर्चेला पेव फुटले आहे. 

संतोष रामचंद्र वाटेकर(35) हा वणीतील  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये कॅश टाकणाऱ्या कंपनी एपीएस लॉजी कॅश सोल्युशन प्रा. ली. येथे गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत होता. 20 फेब्रुवारी रोजी अशाच प्रकारची कॅश टाकण्याकरिता तो 28 लाख रुपये घेऊन निघाला. 

परंतु ही रक्कम त्याने एटीएम मध्ये भरली नाही. त्यावेळी स्टेट बँकेकडून संतोषच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी संतोषावर गुन्हा दाखल केला होता. सोबतच संतोषच्या भावाने तो हरवल्याची तक्रार वणी पोलिसात दिली. तक्रार मिळताच पोलीस यंत्रणा त्याचा शोध घेत होती. परंतु संतोष कुठेही मिळून आला नाही. अचानक शनिवारी 29 फेब्रुवारी रोजी दुपारी संतोष याचे शव हे कोरपना तालुक्यातील खैरगाव ते गाडेगाव रोडवरील नाल्याजवल मिळून आल्याने एकाच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मेंढपाळ असलेल्या एका व्यक्तीने खैरगाव येथील पोलीस पाटलास दिली. पोलीस पाटलांनी लगेच कोरपना पोलोसात याबाबत माहिती दिली. कोरपना पोलिसांनी त्याच्या हातावर संतोष हे नाव गोदवून असल्याने या नावाचा कुणी व्यक्ती मिसिंग असल्याची माहिती घेतली. असा संतोष नामक व्यक्ती हा वणीतून मिसिंग असल्याची माहिती मिळाली. कोरपना पोलिसांनी याबाबत वणी पोलिसांना माहिती दिली. वणी पोलीस आरोपीच्या भावाला आरोपीची ओळख पटविण्याकरिता  सोबत घेऊन गेले.   

त्याच्या भावाने सदर मृतदेह हा संतोषचा असल्याची माहिती दिली. त्यानंतर संतोषाचा मृतदेह हा वणी येथे त्याच्या घरी आणण्यात आला. परंतु संतोषच्या पत्नीने हा मृतदेह आपल्या पतीचा नसल्याचे संगीतल्याने काही काळ पोलोसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. जवळपास एक दीड तासानंतर त्याची पत्नी व परिवारातील व्यक्तीने सदर शव हे संतोषचेच असल्याचे मान्य केले.   

सदर शव हे जरी संतोषचे असले तरी ते त्या ठिकाणी कसे पोहचले? त्याच्या मृतदेहास डिझेल टाकून जळण्याचाही प्रयत्न केला असल्याचे समजते. सोबतच त्याच्याजवळ असलेली रक्कम कुठे गेली ? त्याची हत्या की, घातपात झाला? यामागे कोण आहे ? असे अनेक प्रश्न आता पोलिसांपुढे 'आ' करून उभे आहे. संतोषच्या अचानक झालेल्या मृत्यूने त्याचा परिवार हादरून गेला आहे व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.