अखेर डॉ. आकाश जिवने निलंबित व भंडारा येथे स्थानबदली : सिइओ जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणे पडले महागात : आदेशाची पायमल्ली करणाऱ्या मुजोर डॉक्टर ला नवीन आदेश प्राप्त होताच 2 लेखी स्वरूपात पोचपावती पाठविण्याचेही उपसंचालकांचा वेगळा आदेश #health ministry of maharastra - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

अखेर डॉ. आकाश जिवने निलंबित व भंडारा येथे स्थानबदली : सिइओ जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणे पडले महागात : आदेशाची पायमल्ली करणाऱ्या मुजोर डॉक्टर ला नवीन आदेश प्राप्त होताच 2 लेखी स्वरूपात पोचपावती पाठविण्याचेही उपसंचालकांचा वेगळा आदेश #health ministry of maharastra

Share This
खबरकट्टा / चंद्रपूर : कोरपना -

गंभीर स्वरूपाच्या फौजदारी गुन्ह्यात जमानतीवर असलेल्या एका जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणे चांगलेच महागात पडले असून अखेर या मुजोर डॉक्टर चे निलंबनासहित विभागीय चौकशी व तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा बदलीचे आदेश उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर यांनी दिले आहेत. सविस्तर माहिती नुसार डॉ आकाश रामदास जीवने, वौद्यकीय अधिकारी, गट -अ (वर्ग -2)प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा, जि. चंद्रपूर यांना एका महिलेला अंघोळ करताना गुप्तपणे नग्न अवस्थेतील मोबाईलवर फोटो काढून व फिर्यादी महिलेला  ब्लॅकमेल करून जबरदस्तीने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले व बदनामी करून सदर महिलेचे जुडलेले लग्न मोडले आशा आशयाची 28/12/2019 ला  पोलीस स्टेशन कोरपना येथे भादंवि कलम 276,376(2)(n) व माहिती तंत्रज्ञान( सुधारणा ) अधिनियम 2008 अंतर्गत कलम 68 अन्वय 48 तासापेक्षा अधिक काळ  पोलीस कोठडीत स्थानबद्ध करण्यात आले होते. 

त्यानंतर  डॉ. जीवने यांनी आपल्या विरुद्ध या फौजदारी गुन्ह्याबतचे प्रकरण न्यायाधीन असून या 15/01/2020 पासून जमानतीवर असून 17 /01/2020 पासून रुजू होण्यास प्रकरणाबाबत 17/01/2020 ला वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र देऊन विनंती अर्ज सादर केला होता. परंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री.राहूल कर्डीले  यांनी महाराष्ट्र नागरी सेवा( शिस्त व अपील )  नियम  1979 मधील भाग 1 सवसाधारण (4) निलंबन (2) (अ) या शासन निर्णयातील तरतुदीनुसार डॉ. जिवने यांचे गैरशिस्त वर्तणूक संबंधाने त्यांचेविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करत त्यांची नारंडा येथून पदस्थापना आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे तात्काळ अंमलबजावणी स्वरूपाने आदेश क्रमांक /आरोग्य /स्था-1/1213/2020 दिनांक 12/02/2020 रोजी आदेश पारित केले होते. 

परंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत डॉ. जीवने यांनी आदेश मिळाला नसल्याची बतावणी करीत अधिकाऱ्यांविरुद्ध मुजोरी सत्र सुरु केले होते. सादर गैरवर्तणुकीची गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री.राहूल कर्डीले यांनी प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, (सेवा -4ब ),मंत्रालय मुंबई यांना पत्र देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्यानंतर डॉ. एस. के. जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ यांच्या मार्फत डॉ. जीवने यांच्या 28/12/2020 पासून निलंबनाचे आदेश पारित केले असून  विभागीय चौकशी चालू करण्यात येऊन चौकशी सुरु असेपर्यंत त्यांची नारंडा येथून थेट जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे स्थानबदली करण्यात आली आहे. तात्काळ स्वरूपात डॉ. जिवने यांच्यावर विभागीय चौकशी बसविण्यात आली असून या संबंधात संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेशही आरोग्य सेवा आयुक्त श्री. विश्वास कुमावत यांनी उपसंचालक, नागपूर यांना दिले आहेत. 

त्यानतंर विषेश म्हणजे उपसंचालकांनी दिलेल्या निलंबन व स्थानबदली याही आदेशाची अहवेलना होऊ नये म्हणून आदेश पोहोचताच आदेशाची पोचपावती लेखी स्वरूपात 3 प्रतीत जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर यांचेमार्फत कार्यालयात सादर करण्याचेही वेगळे पत्र काढून उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर यांनी दिले आहेत.