19 मार्च रोजी महाराष्ट्रात सर्वत्र होणार अन्नदात्यासाठी अन्नत्याग लाखोंचा सहभाग अपेक्षित-अमर हबीब #maharashtra - Khabarkatta ✒ खबरकट्टा

           Khabarkatta ✒ खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'

19 मार्च रोजी महाराष्ट्रात सर्वत्र होणार अन्नदात्यासाठी अन्नत्याग लाखोंचा सहभाग अपेक्षित-अमर हबीब #maharashtra

Share This
खबरकट्टा / महाराष्ट्र : पुणे -19 मार्च रोजी देशात लाखो लोक उपवास करून आत्महत्या केलेल्या शेतकऱयांना श्रद्धांजली अर्पण करून शेतकऱयांविषयी सहवेदना व्यक्त करणार आहेत. अशी माहिती किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने अमर हबीब यांनी दिली.19 मार्च 1986 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे यांनी पावनार जवळच्या दत्तपुर येथे आपल्या सर्व कुटुंबासोबत आत्महत्या केली होती. त्या घटनेने सारा महाराष्ट्र हादरला होता. साहेबराव करपे यांनी लिहिलेल्या पत्रात शेतकऱयांच्या दुर्दशेचे वर्णन करून सरकारने त्याकडे लक्ष देण्याची विनंती केली होती. दुर्दैवाने कोणत्याच पक्षाच्या सरकारने शेतकऱयांच्या दुःखाचे खरे कारण असलेल्या शेतकरीविरोधी कायद्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे त्या दिवसानंतर एकही दिवस असा गेला नाही की ज्या दिवशी शेतकऱयांची आत्महत्या झाली नाही. 

साहेबराव करपे यांच्या स्मृती दिनी 1917 साली पहिल्यांदा किसानपुत्र आंदोलनाने एक दिवस अन्नत्याग करण्याचे आवाहन केले होते. त्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील व परदेशातील किसानपुत्रानी प्रचंड प्रतिसाद दिला होता. त्यानंतर दरवर्षी 19 मार्च रोजी एक दिवसाचा उपवास केला जातो.

अमर हबीब यांनी सांगितले की ते यावर्षी पुणे येथे तेथील किसानपुत्रांसोबत उपोषण करणार आहेत. शेतकऱयांचा आसूड लिहीणार्या म फुले यांच्या फुलवाड्यातून येऊन ते बालगंधर्व रंगमंदिरा समोर राणी लक्ष्मीबाईच्या पुतळ्याजवळ उपोषणाला बसणार आहेत.
महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात 19 मार्च ला उपवास केला जाईल असेही त्यांनी सांगितले.

विविध पर्याय-1) ज्यांना शक्य आहे त्यांनी रीतसर परवानगी घेऊन दिवसभर उपोषण करावे.2) ज्यांना दिवसभर बसने शक्य नाही त्यांनी वैयक्तिक उपवास करावा3) उपोषण किंवा उपवास करणार्यानी संध्याकाळी एखाद्या ठिकाणी एकत्र जमून उपोषणाची सांगता करावी4) शाळा महाविद्यालयात दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली अर्पण करावीअसे किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने अमर हबीब यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांचा सहभाग -
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, सुराज्य संघटनेचे प्रा वारे, शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील, आंतरभरतीचे अध्यक्ष प्राचार्य सदाविजयजी आर्य, गजलनवाज भीमराव पांचाळे, चित्रपट कलावंत व आमआदमी पक्षाचे प्रवक्ते संदीप मेहता, सुवर्ण भारत पक्षाचे संजय सोनवणी, जलतज्ञ उपेंद्र दादा धोंडे असे अनेक मान्यवर 19 मार्च रोजी उपवास करणार आहेत.